तुमच्या फोन नंबरची पडताळणी कशी करावी

Android
iPhone
KaiOS
WhatsApp खाते तयार करण्यासाठी तुमच्याकडे सक्रिय फोन नंबर असणे गरजेचे आहे. तुम्हाला पडताळणी प्रक्रियेमध्ये अडचणी येत असतील तर खालील गोष्टींची खात्री करुन घ्या:
  • तुमच्याकडे ॲप स्टोअर वरून इंस्टॉल केलेली WhatsApp ची नवीन आवृत्ती आहे याची खात्री करा.
  • तुम्ही कंट्री कोड टाकून (किंवा देशांच्या यादीमधून तुमचा देश निवडून) संपूर्ण आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधील फोन नंबर एंटर केलेला आहे याची खात्री करून घ्या.
    • अमेरिकेतील फोन नंबरचे उदाहरण: + 1 408 XXX-XXXX.
  • तुमच्या फोन नंबरमध्ये सुरुवातीचे अतिरिक्त शून्य (0) किंवा एक्झिट कोड एंटर करू नका.
  • तुमच्या फोनवरील इंटरनेट कनेक्शन सुरू आहे आणि इंटरनेट वेगवान आहे, याची खात्री करून घ्या. खात्री करून घेण्यासाठी एखादे वेबपेज उघडून पहा.
  • तुमच्या फोनवर आंतरराष्ट्रीय एसएमएस येतो आहे का याची खात्री करून घ्या.
  • तुम्ही iPod Touch किंवा iPad सारखी सपोर्ट नसलेली डिव्हाइसेस वापरत नाही आहात याची खात्री करून घ्या.
  • तुमचे डिव्हाइस जेलब्रोकन नाही ना, हे तपासा.
  • तुम्ही सपोर्ट असलेला फोन नंबर वापरत आहात याची खात्री करा. सपोर्ट नसलेल्या फोन नंबरची WhatsApp वर नोंदणी केली जाऊ शकत नाही. या फोन नंबर्समध्ये खालील फोन नंबर्सचा समावेश आहे:
  • VoIP
  • लॅंडलाइन्स (टीप: लॅंडलाइन नंबर्सना फक्त WhatsApp Business ॲपवर सपोर्ट आहे)
  • टोल-फ्री नंबर्स
  • पेड प्रीमियम नंबर्स
  • युनिव्हर्सल ॲक्सेस नंबर्स (UAN)
  • खाजगी नंबर्स
तुमचा फोन नंबर एंटर केल्यानंतर कृपया तुमच्या फोनवर SMS येण्याची प्रतीक्षा करा. या एसएमएसमध्ये ६ अंकी पडताळणी कोड असेल, जो तुम्ही WhatsApp मधील पडताळणी स्क्रीनवर एंटर करू शकता. पडताळणी कोड हा युनिक असतो आणि तुम्ही जेव्हा केव्हा फोन नंबर किंवा डिव्हाइस बदलून त्याची पडताळणी करता तेव्हा प्रत्येक वेळी तो बदलतो. कृपया, पडताळणी कोड अंदाजाने ओळखण्याचा प्रयत्न करू नका. चुकीचे कोड एंटर केल्यास तुम्हाला ठरावीक काळासाठी पडताळणी प्रक्रियेमधून लॉक आउट केले जाईल.
टीप: तुमच्याकडे iCloud Keychain सुरू केलेले असल्यास आणि या नंबरची पूर्वी पडताळणी केली असल्यास, तुम्हाला नवीन एसएमएस कोड न मिळता तुमची आपोआप पडताळणी होईल.
तुम्हाला एसएमएसद्वारे कोड मिळाला नसेल तर, आमची ऑटोमेटेड सिस्टीम तुम्हाला तुमचा कोड कळवण्यासाठी कॉल करेल. कृपया काउंट डाऊन संपेपर्यंत पाच मिनिटे प्रतीक्षा करा आणि या काळात तुमचा नंबर बदलू नका. पाच मिनिटे प्रतीक्षा केल्यानंतर मला कॉल करा वर टॅप करा.
टीप: तुमच्या मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडरनुसार तुम्हाला एसएमएस किंवा फोन कॉलसाठी शुल्क लागू शकते.
जर तुम्ही वरील सर्व उपाय करून बघितले असतील आणि तरीदेखील तुम्हाला कोड मिळाला नसेल तर, कृपया खालील उपाय करून बघा:
  1. तुमच्या iPhone वरून WhatsApp अनइंस्टॉल करून बघा.
  2. तुमचा iPhone रीबूट करा > तुमचा फोन बंद करा व पुन्हा सुरू करा.
  3. ॲप स्टोअर वरून WhatsApp ची नवीन आवृत्ती डाउनलोड करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही