Meta Companies सोबत WhatsApp कोणती माहिती शेअर करते?

WhatsApp सध्या Meta Companies सोबत ठरावीक कॅटेगरीमधील माहिती शेअर करते. आम्ही इतर Meta Companies सोबत शेअर करतो त्या माहितीमध्ये तुमची खाते नोंदणी माहिती (उदाहरणार्थ तुमचा फोन नंबर), ट्रान्झॅक्शन डेटा (तुम्ही WhatsApp वर Facebook Pay किंवा शॉप्स वापरल्यास), सेवेशी संबंधित माहिती, आमच्या सर्व्हिसेस वापरताना तुम्ही बिझनेसेससोबत कसा संवाद साधता त्याविषयीची माहिती, मोबाइल डिव्हाइस माहिती, तुमचा IP ॲड्रेस आणि गोपनीयता धोरण यामधील "आम्ही गोळा करतो ती माहिती" याअंतर्गत येणारी किंवा तुम्हाला सूचना दिल्यानंतर मिळवलेली अथवा तुमच्या संमतीवर आधारित माहिती समाविष्ट असू शकते.
आम्ही Meta सोबत शेअर करतो ती माहिती अतिशय मर्यादित असते. याचेच एक उदाहरण म्हणजे, आम्ही तुमची वैयक्तिक संभाषणे नेहमी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित करतो. ही वैयक्तिक संभाषणे कोणीही, अगदी WhatsApp किंवा Meta देखील वाचू शकत नाही. कोण कोणाला मेसेज किंवा कॉल करते आहे याचे लॉग्स आम्ही ठेवत नाही. तुम्ही तुमचे लोकेशन शेअर केले असेल तर आम्ही ते पाहू शकत नाही आणि त्यामुळेच आम्ही ते Meta सोबत शेअर करू शकत नाही व करतही नाही. तुम्हाला सर्व्हिस देता यावी यासाठी आम्हाला तुमचे संपर्क आवश्यक असतात, परंतु आम्ही तुमचे संपर्क Meta सोबत शेअर करत नाही. अशा काही मर्यादांविषयी तुम्ही येथे अधिक जाणून घेऊ शकता.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही