"हा ग्रुप आता यापुढे उपलब्ध नसेल" याचा काय अर्थ आहे?

ग्रुपचे विषय, प्रोफाइल फोटो आणि ग्रुपविषयी माहिती अशा माहितीचे मूल्यांकन करण्यासाठी WhatsApp प्रगत मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करते. याशिवाय, वापरकर्त्यांना कोणत्याही चॅटमधून आमच्याकडे तक्रार नोंदवता यावी यासाठी आम्ही सुलभ पर्याय देऊ करतो. आमच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांचे अनुपालन करण्याचा भाग म्हणून किंवा एखादा ग्रुप ॲडमिन आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन करत असेल, तेव्हा आम्ही चॅट ग्रुप्सच्या वापरावर आळा घालू शकतो.
अतिरिक्त मदतीसाठी, कृपया आमच्या WhatsApp सपोर्ट टीमशी संपर्क साधा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही