ग्रुप व्हॉइस कॉल कसा करावा

WhatsApp मधील ग्रुप कॉलिंग वापरून एकावेळी कमाल ३२ सदस्यांसोबत मोफत ग्रुप व्हॉइस कॉल करता येतो. व्हॉइस कॉलिंग तुमच्या फोनच्या मोबाइल प्लॅनच्या मिनिटांऐवजी फोनमधील इंटरनेट कनेक्शन वापरते. त्यामुळे डेटा शुल्क लागू शकते. तुम्हाला ग्रुप व्हॉइस कॉल येतो, तेव्हा तुम्हाला इनकमिंग WhatsApp ऑडिओ... स्क्रीनवर सध्या कॉलवर असलेले सदस्य दिसतात. ज्या सदस्याने तुम्हाला कॉलमध्ये समाविष्ट केले, त्याचे नाव सर्वात वर दिसते. पूर्वीचे ग्रुप व्हॉइस कॉल्स हे 'कॉल्स' टॅबमध्ये दिसतील. कॉलमध्ये कोण कोण होते हे पाहण्यासाठी तुम्ही 'पूर्वीचे कॉल्स' वर टॅप करू शकता. तुमच्याकडून मिस झालेला कॉल अद्याप सुरू असल्यास तुम्ही त्या कॉलमध्येही सामील होऊ शकता.
ग्रुप व्हॉइस कॉल करणे
ग्रुप चॅटमधून ग्रुप व्हॉइस कॉल करण्यासाठी:
  1. तुम्हाला ज्या ग्रुपला व्हॉइस कॉल करायचा आहे त्या ग्रुपचे चॅट उघडा.
  2. तुमच्या ग्रुपमध्ये ३३ किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असल्यास, ग्रुप कॉल
    वर टॅप करा.
    • तुमच्या ग्रुपमध्ये ३२ किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असल्यास, व्हॉइस कॉल
      वर टॅप करा आणि तुमचा निर्णय कन्फर्म करा. जे सात सदस्य सर्वात आधी उत्तर देतील ते कॉलमध्ये सामील होऊ शकतात आणि फक्त ग्रुपचे सदस्यच कॉलमध्ये सहभागी होऊ शकतात.
  3. तुम्हाला ज्या संपर्कांना व्हॉइस कॉलमध्ये जोडायचे आहे ते संपर्क शोधा आणि व्हॉइस कॉल
    वर टॅप करा.
‘कॉल्स’ टॅबमधून ग्रुप व्हॉइस कॉल करणे
  1. WhatsApp उघडा आणि कॉल्स टॅबवर टॅप करा.
  2. नवीन कॉल
    > नवीन ग्रुप कॉल वर टॅप करा.
  3. तुम्हाला ज्या संपर्कांना व्हॉइस कॉलमध्ये जोडायचे आहे ते संपर्क शोधा आणि व्हॉइस कॉल
    वर टॅप करा.
वैयक्तिक चॅटमधून ग्रुप व्हॉइस कॉल करणे
  1. ज्या संपर्कांना व्हॉइस कॉल करायचा आहे, त्यापैकी एका संपर्कासोबत वैयक्तिक चॅट सुरू करा.
  2. व्हॉइस कॉल
    वर टॅप करा.
  3. संपर्काने तुमचा कॉल स्वीकारल्यानंतर, उघडा
    > सदस्य जोडा यावर टॅप करा.
  4. तुम्हाला आणखी ज्या संपर्कांना व्हिडिओ कॉलमध्ये समाविष्ट करायचे आहे ते संपर्क शोधा आणि जोडा वर टॅप करा.
  5. आणखी सदस्यांना समाविष्ट करायचे असल्यास, सदस्य जोडा
    वर टॅप करा.
ग्रुप व्हॉइस कॉलमध्ये सहभागी होणे
इनकमिंग ग्रुप व्हॉइस कॉलमध्ये सहभागी होणे
  1. एखादी व्यक्ती तुम्हाला ग्रुप व्हॉइस कॉलमध्ये येण्याचे आमंत्रण देते तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.
  2. कॉल तपशिलांची स्क्रीन उघडण्यासाठी नोटिफिकेशनवर टॅप करा.
  3. या स्क्रीनवरून, तुम्ही कॉलमधील सहभागी सदस्य आणि इतर आमंत्रित पाहू शकता.
  4. कॉलमध्ये सामील होण्यासाठी सामील व्हा वर टॅप करा.
  5. कॉलवर असताना, उघडा
    वर टॅप करा आणि कॉल माहितीची स्क्रीन उघडा.
    • कॉलमध्ये आणखी संपर्कांना जोडण्यासाठी सदस्य जोडा वर टॅप करा.
    • आधीपासून आमंत्रित केलेल्या लोकांना नोटिफिकेशन पाठवण्यासाठी रिंग करा वर टॅप करा.
मिस झालेल्या ग्रुप व्हॉइस कॉलमध्ये सामील होणे
  1. WhatsApp उघडा आणि कॉल्स टॅबवर टॅप करा.
  2. ग्रुप चॅटमधून कॉल सुरू झालेला असल्यास, तुम्ही ते चॅट उघडून आणि सामील व्हा वर टॅप करून कॉलमध्ये सामील होऊ शकता.
  3. कॉल सुरू असल्यास, तुम्हाला सामील व्हायचे आहे त्या कॉलवर टॅप करा. हे केल्यास कॉल माहितीची स्क्रीन उघडेल.
  4. सामील व्हा वर टॅप करा.
टीप:
  • ग्रुप व्हॉइस कॉल करत असताना किंवा तो घेताना, तुमच्याकडे आणि तुमच्या संपर्कांकडे उत्तम इंटरनेट कनेक्शन आहे याची खात्री करा. एखाद्या संपर्काकडील कनेक्शन खराब असल्यास, त्यानुसार ऑडिओ कॉलची गुणवत्तादेखील बदलेल.
  • ग्रुप व्हॉइस कॉल सुरू असताना, तुम्ही व्हिडिओ कॉलला स्विच करू शकणार नाही.
  • ग्रुप व्हॉइस कॉल सुरू असताना तुम्हाला कोणत्याही संपर्काला काढता येणार नाही. एखाद्या संपर्काने कॉल समाप्त केला तरच तो कॉलमधून डिस्कनेक्ट होईल.
  • तुम्ही ब्लॉक केलेला एखादा संपर्क तुमच्यासोबत ग्रुप व्हॉइस कॉलमध्ये आहे असे होऊ शकते. पण लक्षात घ्या, की तुम्ही ब्लॉक केलेल्या संपर्कास किंवा ज्या संपर्काने तुम्हाला ब्लॉक केले आहे त्या संपर्कास तुम्ही कॉलमध्ये समाविष्ट करू शकणार नाही.
  • व्हॉइस कॉलिंग iOS 12 किंवा त्यापुढील आवृत्ती असलेल्या iPhone वर उपलब्ध आहे.
  • तुम्ही WhatsApp द्वारे आपत्कालीन सेवांचे नंबर्स ‍ॲक्सेस करू शकत नाही, जसे की, भारतामध्ये तुम्ही WhatsApp वरून 100 हा नंबर वापरू शकत नाही. आपत्कालीन कॉल करायचा असल्यास तुम्ही एखादा पर्यायी मार्ग वापरणे गरजेचे आहे.
संबंधित लेख:
  • पुढील प्लॅटफॉर्म्सवर व्हॉइस कॉल कसा करावा: Android | iPhone
  • Android वर ग्रुप व्हॉइस कॉल कसा करावा
हे मदतीचे होते का?
होय
नाही