संपर्क कसा जोडावा

एखादा संपर्क जोडायचा असेल, तर त्यासाठी अनेक मार्ग आहेत.
नवीन चॅट वापरून संपर्क जोडणे
 1. WhatsApp उघडा.
 2. चॅट टॅबवर जा.
 3. नवीन चॅट
  > नवीन संपर्क
  यावर टॅप करा.
चॅटच्या माहितीतून संपर्क जोडणे (तुम्ही चॅट केले आहे, पण सेव्ह केलेले नाहीत असे नंबर्स)
 1. WhatsApp उघडा.
 2. चॅट टॅबवर जा.
 3. सेव्ह न केलेल्या नंबरसोबतचे चॅट उघडा. चॅटच्या सूचीतील त्या चॅटवर नाव दिसणार नाही, नंबर दिसेल.
 4. चॅटची माहिती पाहण्यासाठी सर्वात वरच्या ॲप बारवर टॅप करा.
 5. नवीन संपर्क तयार करा वर टॅप करा.
ग्रुप्समधून संपर्क जोडणे
 1. संपर्कांमध्ये समाविष्ट केलेला नाही अशा नंबरसोबतच्या मेसेजवर टॅप करा.
 2. संपर्कांमध्ये जोडा वर टॅप करा. खालीलपैकी एक पर्याय निवडा:
  • नवीन संपर्क तयार करा - नाव आणि फोन नंबर तपासून पहा.
  • आधीपासून असलेल्या संपर्कामध्ये जोडा - आधीपासून सेव्ह असलेला नंबर निवडा आणि नाव व नंबर तपासून पहा.
आंतरराष्ट्रीय नंबर वापरणारे संपर्क जोडण्याकरिता, कृपया हा लेख पहा.
हे मदतीचे होते का?
होय
नाही