एखाद्याने तुम्हाला ब्लॉक करणे

तुम्हाला कोणी ब्लॉक केले आहे का हे खालील गोष्टींवरून समजू शकते:
  • तुम्हाला आता चॅट विंडोमध्ये संपर्काचे अखेरचे पाहिलेले किंवा ऑनलाइन असल्याचे दिसणार नाही. येथे अधिक जाणून घ्या.
  • तुम्हाला संंपर्काचे अपडेट केलेले प्रोफाइल फोटो दिसणार नाहीत.
  • तुम्हाला ब्लॉक केलेल्या व्यक्तीला पाठवलेल्या कोणत्याही मेसेजेसवर एक बरोबरची खूण (मेसेज पाठवला) दिसेल आणि दुसरी बरोबरची खूण (मेसेज डिलिव्हर झाला) कधीही दिसणार नाही.
  • तुम्ही कॉल्स करायचा प्रयत्न करत असल्यास ते लागणार नाहीत.
एखाद्या संपर्काविषयी वरील सर्व चिन्हे दिसत असल्यास, वापरकर्त्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे असे असू शकते. अर्थात, इतर शक्यता असू शकतात. तुम्ही एखाद्याला ब्लॉक करत असताना तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही या प्रक्रियेस मुद्दामून संदिग्ध बनवले आहे. म्हणून, तुम्हाला एखाद्याने ब्लॉक केले असल्यास आम्ही ते तुम्हाला सांगू शकत नाही.
एखाद्याला कसे ब्लॉक करायचे ते जाणून घ्या : Android | iPhone
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही