वाचल्याची पोचपावती कशी तपासावी
Android
iPhone
KaiOS
तुम्ही पाठवत असलेल्या प्रत्येक मेसेजसमोर बरोबरच्या खुणा दिसतील. त्यांचा अर्थ खालीलप्रमाणे:
- मेसेज यशस्वीरीत्या पाठवला गेला आहे.
- मेसेज प्राप्तकर्त्याच्या फोनवर किंवा त्यांच्या लिंक केलेल्या डिव्हाइसवर यशस्वीरीत्या पोहोचला आहे.
- प्राप्तकर्त्याने तुमचा मेसेज वाचला आहे.
टीप:
- प्राप्तकर्त्याच्या लिंक केलेल्या कोणत्याही फोनवर - मग तो ऑफ असला तरीही - मेसेज पोहोचेल, तेव्हा मेसेजपुढे दोन बरोबरच्या खुणा दिसतील.
- ग्रुप चॅटमध्ये जेव्हा सर्व सदस्यांकडे मेसेज पोहोचेल, तेव्हा दोन बरोबरच्या खुणा दिसतील. दोन निळ्या बरोबरच्या खुणांचा अर्थ असा, की तो मेसेज सर्व ग्रुप सदस्यांनी वाचला आहे.
मेसेजविषयी माहिती
तुम्ही कोणताही मेसेज पाठवता तेव्हा तुम्ही तुम्हाला मेसेजविषयी माहिती देणारी स्क्रीन दिसते, ज्यात तुमचा मेसेज कधी पोचला, वाचला किंवा प्राप्तकर्त्यांद्वारे प्ले केला गेला ही माहिती असते.
मेसेजविषयी माहिती देणारी स्क्रीन पाहण्यासाठी:
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
- तुम्ही पाठवलेल्या मेसेजवर टॅप करून धरून ठेवा.
- वर टॅप करा. किंवा, तुम्हाला अधिक पर्याय> माहिती यावर टॅप करावे लागू शकते.
मेसेजविषयी माहिती देणाऱ्या स्क्रीनवर पुढील गोष्टी दिसतात:
पोहोचला:
- तुमचा मेसेज तुमच्या प्राप्तकर्त्याच्या फोनवर किंवा लिंक केलेल्या डिव्हाइसवर पोहोचला आहे, परंतु त्यांनी तो पाहिलेला नाही.
वाचला किंवा पाहिला:
- प्राप्तकर्त्याने तुमचा मेसेज वाचलेला आहे किंवा तुमचा फोटो, ऑडिओ/व्हिडिओ बघितलेला आहे.
- प्राप्तकर्त्याने तुमचा व्हॉइस मेसेज पाहिलेला आहे, परंतु अद्याप प्ले करून ऐकलेला नाही.
प्ले केला:
- प्राप्तकर्त्याने तुमचा व्हॉइस मेसेज प्ले करून ऐकलेला आहे.
टीप: एखादा सदस्य ग्रुप सोडतो, तेव्हाही मेसेजविषयी माहिती देणाऱ्या स्क्रीनवर ज्या सदस्याने गट सोडला आहे त्याच्या माहितीसह सर्व सदस्यांची माहिती दिसेल.
वाचल्याची पोचपावती न मिळणे
तुम्ही पाठवलेल्या मेसेज किंवा व्हॉइस मेसेजच्या बाजूला तुम्हाला दोन निळ्या बरोबरच्या खुणा, निळा मायक्रोफोन किंवा "उघडला" हे लेबल दिसत नसल्यास:
- तुम्ही किंवा तुमच्या प्राप्तकर्त्याने गोपनीयता सेटिंग्ज मधून वाचल्याची पोचपावती बंद केली असेल.
- प्राप्तकर्त्याने तुम्हाला ब्लॉक केले असेल.
- प्राप्तकर्त्याने कदाचित तुमचे संभाषण अजून उघडले नसेल.
- तुम्ही किंवा प्राप्तकर्ता यांच्याकडील कनेक्शनमध्ये समस्या असेल.
वाचल्याची पोचपावती बंद ठेवा
वाचल्याची पोचपावती बंद करण्यासाठी, अधिक पर्याय
> सेटिंग्ज > गोपनीयता यावर टॅप करा आणि वाचल्याची पोचपावती बंद करा.

टीप: यामुळे ग्रुप चॅट किंवा व्हॉइस मेसेजेसची वाचल्याची पोचपावती बंद होणार नाही. ही सेटिंग्ज बंद करण्याचा कोणताही मार्ग नाही.