WhatsApp Business ॲप कसे डाउनलोड करावे

Android
iOS
WhatsApp Business ॲप हे लघु उद्योजकांसाठी असलेले आणि निःशुल्क डाउनलोड करता येणारे ॲप आहे.
ॲप डाउनलोड करण्याअगोदर कृपया खालील गोष्टींची काळजी घ्या:
  • तुमच्याकडे अगोदरपासूनच WhatsApp Messenger खाते असल्यास, तुम्ही नवीन WhatsApp Business खात्यावर तुमचे पूर्वीचे चॅट आणि मीडिया फाइल्स यांसह तुमच्या खात्याची माहिती सहजरीत्या मायग्रेट करू शकता.
  • तुम्ही WhatsApp Business ॲप वापरणे बंद केलेत, तर तुमचे पूर्वीचे चॅट पुन्हा WhatsApp Messenger वर मायग्रेट केले जाणार नाही.
  • तुम्ही एकाच वेळी WhatsApp Business ॲप आणि WhatsApp Messenger वापरू शकता; फक्त त्यावरील खाती वेगवेगळ्या फोन नंबर्सशी जोडलेली आहेत याची खात्री करून घ्या. एका वेळी एकाच फोन नंबरवर दोन्ही ॲप्स लिंक करता येणार नाहीत.
WhatsApp Business ॲप सेट करण्यासाठी:
  1. Apple App Store वरून WhatsApp Business ॲप डाउनलोड करा.
  2. तुमच्या बिझनेस फोन नंबरची पडताळणी करा.
  3. तुमची इच्छा असेल, तर बॅकअपमधून तुमचे खाते रिस्टोअर करा.
  4. तुमच्या बिझनेसचे नाव सेट करा.
  5. तुमचे प्रोफाइल तयार करा. सेटिंग्ज > 'तुमच्या बिझनेसचे नाव' यावर टॅप करा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही