WhatsApp Business ॲप कसे डाउनलोड करावे
Android
iPhone
WhatsApp Business ॲप हे लघु उद्योजकांसाठी असलेले आणि निःशुल्क डाउनलोड करता येणारे ॲप आहे.
ॲप डाउनलोड करण्याअगोदर कृपया खालील गोष्टींची काळजी घ्या:
- तुमच्याकडे जर अगोदरपासूनच WhatsApp Messenger खाते असेल तर, तुम्ही तुमचे पूर्वीचे चॅट आणि मीडिया यासहीत तुमचे खाते नवीन WhatsApp Business खात्यावर सहजरीत्या मायग्रेट करू शकता.
- तुम्ही WhatsApp Business ॲप वापरणे बंद केले तर, तुमचे पूर्वीचे चॅट पुन्हा WhatsApp Messenger वर मायग्रेट केले जाणार नाही.
- तुम्ही एकाच वेळी WhatsApp Business ॲप आणि WhatsApp Messenger वापरू शकता; फक्त त्यावरील खाती वेगवेगळ्या फोन नंबर्सशी जोडलेली आहेत याची खात्री करून घ्या. एका वेळी एकाच फोन नंबरवर दोन्ही ॲप्स लिंक करता येणार नाहीत.
WhatsApp Business ॲप सेट करण्यासाठी:
- Google Play स्टोअर मधून WhatsApp Business ॲप डाउनलोड करा.
- तुमच्या बिझनेस फोन नंबरची पडताळणी करा.
- तुमची वाटल्यास तुमचे खाते बॅकअपमधून रिस्टोअर करा.
- तुमच्या बिझनेसचे नाव सेट करा.
- तुमचे प्रोफाइल तयार करा. अधिक पर्याय> सेटिंग्ज > 'तुमच्या बिझनेसचे नाव' यावर टॅप करा.
संबंधित लेख: