तुमचे बिझनेस प्रोफाइल कसे संपादित करावे

वेब आणि डेस्कटॉप
Android
iPhone
तुमचे बिझनेस प्रोफाइल वापरून तुम्ही तुमच्या कंपनीची माहिती, जसे की - तुमच्या बिझनेसचे नाव, पत्ता, विभाग, वर्णन, ईमेल आणि वेबसाइट, समाविष्ट करू शकता. लोक तुमचे प्रोफाइल बघतील, तेव्हा ही माहिती त्यांना सहज दिसेल.
बिझनेससंबंधित टीप: पूर्ण आणि अचूक बिझनेस प्रोफाइल तुमच्या ग्राहकांना नवीनतम माहिती तर देतेच, शिवाय त्यामुळे तुमच्या बिझनेसच्या वेळापत्रकासारख्या गोष्टींसंबंधित तुम्हाला प्राप्त होणाऱ्या मेसेजेसची संख्यादेखील कमी होऊ शकते.
तुमचे बिझनेस प्रोफाइल पाहण्यासाठी WhatsApp वेब उघडा. त्यानंतर, मेनू
> प्रोफाइल यावर क्लिक करा.
तुमचा प्रोफाइल फोटो संपादित करणे
  1. तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.
  2. खालीलपैकी एक पर्याय निवडा:
    • तुमचा सध्याचा प्रोफाइल फोटो पाहण्यासाठी फोटो पहा निवडा.
    • तुमच्या कॉंप्युटरवरून नवीन फोटो घेण्यासाठी फोटो घ्या निवडा.
    • तुमच्या फाइल्समध्ये आधीपासूनच असलेला फोटो निवडून अपलोड करण्यासाठी फोटो अपलोड करा निवडा.
    • तुमचा सध्याचा प्रोफाइल फोटो काढून टाकण्यासाठी फोटो काढून टाका निवडा.
टीप: तुमचा प्रोफाइल फोटो बाय डीफॉल्ट सार्वजनिक असतो. तुमची गोपनीयता सेटिंग्ज कशी बदलावीत हे जाणून घेण्याकरिता हा लेख जाणून घ्या.
तुमचा कव्हर फोटो संपादित करणे
  1. तुमच्या कव्हर फोटोवरील संपादित करा
    वर क्लिक करा.
  2. खालीलपैकी एक पर्याय निवडा:
    • तुमच्या कॉंप्युटरवरून नवीन फोटो घेण्यासाठी फोटो घ्या निवडा.
    • तुमच्या फाइल्समध्ये आधीपासूनच असलेला फोटो निवडून अपलोड करण्यासाठी फोटो अपलोड करा निवडा.
    • तुमचा सध्याचा कव्हर फोटो काढून टाकण्यासाठी फोटो काढून टाका निवडा.
टीप: तुमचा कव्हर फोटो बाय डीफॉल्ट सार्वजनिक असतो.
तुमच्या बिझनेसचे वर्णन संपादित करणे
  1. बिझनेससंबंधित माहिती फील्डवरील संपादित करा
    वर टॅप करा.
  2. तुम्हाला हवे असलेले बदल करा.
  3. वर क्लिक करा.
तुमच्या बिझनेसची कॅटेगरी संपादित करणे
  1. कॅटेगरी फील्डवरील संपादित करा
    वर क्लिक करा.
  2. तुमच्या बिझनेसकरिता कमाल तीन समर्पक कॅटेगरीज निवडा.
  3. सेव्ह करा वर क्लिक करा.
तुमच्या बिझनेसचा पत्ता संपादित करणे
  1. पत्ता फील्डवरील संपादित करा
    वर क्लिक करा.
  2. तुमच्या बिझनेसचा पत्ता एंटर करा.
  3. वर क्लिक करा.
तुमचे बिझनेस वेळापत्रक संपादित करणे
  1. बिझनेसच्या वेळापत्रक फील्डवरील संपादित करा
    वर क्लिक करा.
  2. तुमच्या बिझनेसचे वेळापत्रक सेट करण्यासाठी खालीलपैकी तुम्हाला हव्या असलेल्या शेड्यूल टेम्प्लेटवर क्लिक करा:
    • निवडक वेळेत उघडे: तुमचा बिझनेस विशिष्ट दिवशीच सुरू असेल, तर ते दिवस निवडण्यासाठी चेकबॉक्सेस वापरा. तुम्ही प्रत्येक दिवसासाठी कामकाजाचे नेमके तासदेखील दर्शवू शकता.
    • नेहमीच उघडे: तुमचा बिझनेस काही विशिष्ट दिवशीच सुरू असेल, तर ते दिवस निवडण्यासाठी चेकबॉक्सेस वापरा.
    • फक्त अपॉइंटमेंटद्वारे: तुमचा बिझनेस आठवड्यातील कोणत्या दिवशी अपॉइंटमेंट घेऊन सुरू असेल हे निवडण्यासाठी चेकबॉक्सेस वापरा.
  3. सेव्ह करा वर क्लिक करा.
तुमचा ईमेल आणि वेबसाइट संपादित करणे
  1. तुम्ही अपडेट करू इच्छिता त्या फील्डवरील संपादित करा
    वर क्लिक करा.
  2. तुमची माहिती अपडेट करा.
  3. वर क्लिक करा.
तुमचा कॅटलॉग संपादित करणे
  1. तुमचा कॅटलॉग अपडेट करण्यासाठी किंवा नवा कॅटलॉग तयार करण्यासाठी कॅटलॉग पहा किंवा व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  2. आवश्यकतेनुसार तुमच्या कॅटलॉगमध्ये प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस जोडा अथवा संपादित करा. कॅटलॉग तयार आणि मेन्टेन कसा करावा याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
'माझ्याबद्दल' मध्ये बदल करणे
  1. बिझनेसबद्दल फील्डवरील संपादित करा
    वर क्लिक करा.
  2. तुमची माहिती अपडेट करा.
  3. वर क्लिक करा.
टीप: तुमच्या बिझनेसचे नाव, नकाशातले लोकेशन, फोन नंबर आणि लिंक केलेली खाती या गोष्टी फक्त मोबाइल डिव्हाइसवर WhatsApp Business ॲप वापरून संपादित करता येतात.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही