तुमचे बिझनेस प्रोफाइल कसे संपादित करावे

वेब आणि डेस्कटॉप
Android
iPhone
तुमचे बिझनेस प्रोफाइल वापरून तुम्ही तुमच्या कंपनीची माहिती, जसे की - तुमच्या बिझनेसचे नाव, पत्ता, विभाग, वर्णन, ईमेल आणि वेबसाइट, समाविष्ट करू शकता. लोक तुमचे प्रोफाइल बघतील, तेव्हा ही माहिती त्यांना सहज दिसेल.
तुमचे बिझनेस प्रोफाइल बघण्यासाठी WhatsApp Business ॲप उघडा. त्यानंतर, अधिक पर्याय
> बिझनेस टूल्स > बिझनेस प्रोफाइल यावर टॅप करा.
तुमचा प्रोफाइल फोटो संपादित करणे
  1. तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा, त्यानंतर संपादित करा
    वर टॅप करा.
    • किंवा, तुमच्या कव्हर फोटोवरील संपादित करा
      वर टॅप करा, त्यानंतर प्रोफाइल फोटो जोडा किंवा संपादित करा वर टॅप करा.
  2. नवा फोटो घेण्यासाठी कॅमेरा वर टॅप करा किंवा आधीपासून उपलब्ध असलेला एखादा फोटो निवडण्यासाठी गॅलरी वर टॅप करा. सध्याचा प्रोफाइल फोटो काढून टाकण्यासाठी तुम्ही हटवा
    > हटवा यावरही टॅप करू शकता.
  3. फोटो निवडला किंवा नवीन फोटो काढला, की आवश्यकतेनुसार फोटो क्रॉप करा किंवा रोटेट करा.
  4. पूर्ण झाले वर टॅप करा.
टीप: तुमचा प्रोफाइल फोटो बाय डीफॉल्ट सार्वजनिक असतो. गोपनीयता सेटिंग्ज कशी बदलावी हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
तुमचा कव्हर फोटो संपादित करणे
  1. तुमच्या कव्हर फोटोवरील संपादित करा
    वर टॅप करा.
  2. कव्हर फोटो जोडा किंवा संपादित करा वर टॅप करा.
  3. नवा फोटो घेण्यासाठी कॅमेरा वर टॅप करा किंवा आधीपासून उपलब्ध असलेला एखादा फोटो निवडण्यासाठी गॅलरी वर टॅप करा. सध्याचा कव्हर फोटो काढून टाकण्यासाठी तुम्ही हटवा
    > हटवा यावरही टॅप करू शकता.
  4. फोटो निवडला किंवा नवीन फोटो काढला, की आवश्यकतेनुसार फोटो क्रॉप करा किंवा रोटेट करा.
  5. पूर्ण झाले वर टॅप करा.
टीप: तुमचा कव्हर फोटो बाय डीफॉल्ट सार्वजनिक असतो.
तुमच्या बिझनेसचे नाव आणि माहिती संपादित करणे
  1. तुम्हाला जी फील्ड्स अपडेट करायची आहेत, तिथे संपादित करा
    वर टॅप करा.
  2. तुम्हाला हवे असलेले बदल करा.
  3. ठीक आहे किंवा सेव्ह करा वर टॅप करा.
तुमच्या बिझनेसची कॅटेगरी संपादित करणे
  1. कॅटेगरी फील्डमध्ये संपादित करा
    वर टॅप करा.
  2. तुमच्या बिझनेसकरिता कमाल तीन समर्पक कॅटेगरीज निवडा.
तुमच्या बिझनेसचा पत्ता संपादित करणे
  1. पत्ता फील्डमध्ये संपादित करा
    वर टॅप करा.
  2. बिझनेसचा पत्ता फील्डवर टॅप करा आणि तुमच्या बिझनेसचा पत्ता एंटर करा.
  3. नकाशावर लोकेशन सेट करा किंवा नकाशावर लोकेशन अपडेट करा यावर टॅप करून तुम्ही तुमचे नकाशातले लोकेशन अपडेट करू शकता. नकाशावर तुमच्या बिझनेसचा पत्ता अपडेट करा आणि त्यानंतर पूर्ण झाले वर टॅप करा.
    • टीप: यामुळे नकाशावर तुमच्या बिझनेसचे फक्त लोकेशन बदलेल. तुम्ही पत्ता फील्डमध्ये एंटर केलेला पत्ता तोच राहील.
  4. सेव्ह करा वर टॅप करा.
तुमचे बिझनेस वेळापत्रक संपादित करणे
  1. बिझनेस वेळापत्रक फील्डमध्ये संपादित करा
    वर टॅप करा.
  2. शेड्यूल करा वर टॅप करा.
  3. खालीलपैकी एक शेड्यूल टेम्पलेट निवडा:
    • निवडक वेळेत उघडे: तुमचा बिझनेस काही विशिष्ट दिवशीच सुरू असेल, तर ते दिवस निवडण्यासाठी टॉगल वापरा. तुम्ही प्रत्येक दिवसासाठी कामकाजाचे नेमके तासदेखील दर्शवू शकता.
    • नेहमीच उघडे: तुमचा बिझनेस आठवड्यातील कोणत्या दिवशी सुरू असेल हे निवडण्यासाठी टॉगल वापरा.
    • केवळ अपॉइंटमेंटद्वारे: तुमचा बिझनेस आठवड्यातील कोणत्या दिवशी अपॉइंटमेंट घेऊन सुरू असेल हे निवडण्यासाठी टॉगल वापरा.
  4. सेव्ह करा वर टॅप करा.
तुमचे बिझनेस वेळापत्रक रीसेट करण्यासाठी तुम्ही अधिक पर्याय
> पुसा यावरही टॅप करू शकता.
तुमचा ईमेल आणि वेबसाइट संपादित करणे
  1. तुम्हाला जी फील्ड्स अपडेट करायची आहेत, तिथे संपादित करा
    वर टॅप करा.
  2. तुमची माहिती अपडेट करा.
  3. सेव्ह करा वर टॅप करा.
तुमची लिंक केलेली सोशल मीडिया खाती संपादित करणे
तुमच्याकडे लिंक केलेली कोणतीही खाती नसल्यास:
  1. Facebook किंवा Instagram जोडा वर टॅप करा.
  2. Facebook किंवा Instagram > पुढे सुरू ठेवा यावर टॅप करा.
  3. तुमच्या बिझनेस प्रोफाइलमध्ये ते खाते जोडण्याकरिता त्या खात्यामध्ये लॉग इन करा.
तुमच्याकडे आधीपासून लिंक केलेली खाती असल्यास:
  1. तुमची लिंक केलेली खाती व्यवस्थापित करण्यासाठी तुमच्या Facebook पेजच्या नावाच्या किंवा Instagram हँडलच्या बाजूला दिसणाऱ्या संपादित करा
    वर टॅप करा.
  2. तुम्ही लिंक केलेले खाते तुमच्या प्रोफाइलवरून लपवू शकता किंवा त्याची लिंक तुमच्या WhatsApp खात्यामधून काढू शकता.
तुमचा कॅटलॉग संपादित करणे
  1. तुमचा कॅटलॉग अपडेट करण्यासाठी किंवा नवा कॅटलॉग तयार करण्यासाठी व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  2. गरजेप्रमाणे तुमच्या कॅटलॉगमध्ये प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस जोडा अथवा संपादित करा. कॅटलॉग तयार आणि व्यवस्थापित कसा करावा याबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
'माझ्याबद्दल' मध्ये बदल करणे
  1. माझ्याबद्दल फील्डमध्ये संपादित करा
    वर टॅप करा.
  2. तुम्ही 'माझ्याबद्दल' विभागासाठी कस्टम मेसेज तयार करू शकता किंवा माझ्याबद्दल' निवडा या विभागामधील आधीपासून सेट केलेला एखादा पर्याय निवडू शकता.
तुमचा फोन नंबर संपादित करणे
तुमचा फोन नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी, फोन नंबर फील्डमध्ये संपादित करा
वर > पुढे वर टॅप करा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही