चॅट्स कशी हटवावीत

Android
iOS
KaiOS

वैयक्तिक चॅट हटवणे

 1. चॅट्स टॅबमध्ये तुम्ही हटवू इच्छिता त्या वैयक्तिक चॅटवर टॅप करा आणि धरून ठेवा.
 2. delete
  > हटवा यावर टॅप करा.

ग्रुप चॅट हटवणे

ग्रुप चॅट हटवण्यासाठी, तुम्ही सर्वप्रथम ग्रुपमधून बाहेर पडणे आवश्यक आहे.
 1. चॅट्स टॅबमध्ये तुम्ही हटवू इच्छिता त्या ग्रुप चॅटवर टॅप करा आणि धरून ठेवा.
 2. more options
  > ग्रुपमधून बाहेर पडा > बाहेर पडा यावर टॅप करा.
 3. ग्रुप चॅटवर पुन्हा टॅप करून धरून ठेवा, त्यानंतर
  delete
  > हटवा यावर टॅप करा.
टीप: ग्रुप एखाद्या कम्युनिटीचा भाग असल्यास, तुम्ही कम्युनिटीवर टॅप करून तो ग्रुप शोधू शकता. तुम्ही शोध बारमध्ये ग्रुपचे नाव टाइप करूनही तुमचा ग्रुप शोधू शकता.

सर्व चॅट्स एकाचवेळी हटवणे

 1. चॅट्स टॅबमध्ये,
  more options
  > सेटिंग्ज > चॅट्स > पूर्वीचे चॅट यावर टॅप करा.
 2. सर्व चॅट्स हटवा वर टॅप करा.
तुमची वैयक्तिक चॅट्स आणि स्टेटस अपडेट्स तुमच्या चॅट्स टॅबवरून हटवली जातील. असे असले, तरी ग्रुप चॅट्स अजूनही तुमच्या चॅट्स टॅबमध्ये दिसतील आणि तुम्ही त्यांमधून बाहेर पडेपर्यंत त्यांचा भाग असाल.
टीप: तुम्‍ही चॅट हटवल्यावर, ही कृती पूर्ववत करता येणार नाही. तुमच्‍यासाठी हटवलेली चॅट्स रिकव्‍हर करू शकत नाही. तुमचा नवीनतम बॅकअप चॅट हटवण्‍यापूर्वी झालेला असेल, तरच तुम्‍ही हटवलेली चॅट्स रिकव्‍हर करू शकता. कृपया लक्षात घ्‍या की नवीनतम बॅकअपनंतरची सर्व चॅट्स तुम्‍ही गमावाल.

संबंधित लेख:

तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?

होय
नाही