नोटिफिकेशनशी संबंधित समस्या

Android
WhatsApp चे मेसेजेस आणि नोटिफिकेशन्स वेळच्या वेळी आणि लवकरात लवकर मिळण्यासाठी तुमचा फोन तशा पद्धतीने कॉन्फिगर केलेला असणे आवश्यक आहे.
तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन आहे याची खात्री करून घ्या
ब्राउझर उघडून, त्यामध्ये एखादी साइट उघडण्याचा प्रयत्न करून तुम्ही इंटरनेट कनेक्शन तपासून पाहू शकता. इंटरनेट कनेक्शनवर ब्राउझिंग करता आले नाही, तर कनेक्शनविषयक समस्या निवारण्याच्या पायऱ्या फॉलो करा.
इंटरनेट कनेक्शनवर ब्राउझिंग करता आले, पण WhatsApp शी कनेक्ट करता आले नाही, तर तुमच्या मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडरशी व सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा आणि तुमचा APN आणि राऊटर यांचे कॉन्फिगरेशन नॉन-वेब आणि सॉकेट कनेक्शन्सना अनुमती देण्याच्या दृष्टीने करण्यात आले आहे याची खात्री करून घ्या. तुम्ही दुसरे एखादे इंटरनेट कनेक्शन वापरून पाहू शकता. म्हणजे, जर तुम्ही वाय-फायशी कनेक्ट केलेले असेल, तर मोबाइल डेटा इंटरनेट वापरून पहा आणि मोबाइल डेटा इंटरनेटशी कनेक्ट केलेले असेल, तर वाय-फाय वापरून पहा.
बॅकग्राउंट डेटा प्रतिबंधित केलेला नाही याची खात्री करून घ्या
 1. तुमच्या फोनमधील सेटिंग्ज ॲप वर जा आणि ॲप्स > WhatsApp > डेटा वापर उघडा.
 2. बॅकग्राउंट डेटा प्रतिबंधित केलेला नाही याची खात्री करून घ्या.
 3. याच पायऱ्या Google सर्व्हिसेस मध्येही वापरा.
समस्या निवारणाचे आणखी उपाय
 • तुमचा फोन रिस्टार्ट करा किंवा बंद करा आणि पुन्हा सुरू करा.
 • तुमच्या फोनच्या सेटिंग्ज ॲपमध्ये ॲप्स > मेनू आयकॉन > ॲप प्राधान्ये रिसेट करा येथे जाऊन ॲप प्राधान्ये रिसेट करा.
 • तुमचा फोन चार्जिंगला लावून ठेवा आणि पॉवर सेव्हिंग मोड ‍ॲक्टिव्हेट होऊ देऊ नका.
 • WhatsApp वर अधिक पर्याय
  > WhatsApp वेब > सर्व कॉंप्युटर्समधून लॉग आउट करा येथे जाऊन WhatsApp वेब मधून लॉग आउट करा.
 • तुमच्या फोनच्या सेटिंग्ज ॲपमध्ये वाय-फाय > सेटिंग्ज आयकॉन > स्लीप मोडमध्येही वाय-फाय सुरू ठेवा > नेहमी येथे जाऊन स्लीप मोडमध्ये असतानाही वाय-फाय सुरू राहील अशा पद्धतीने सेट करा.
 • टास्क किलर्स अर्थात टास्क समाप्त करणारे कोणतेही प्रोग्राम्स असतील तर ते अनइंस्टॉल करा. अशा प्रोग्राम्समुळे तुम्ही ॲप वापरत नसाल तेव्हा ॲपमध्ये मेसेजेस येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
 • Hangouts ॲप उघडा आणि तुमच्या सर्व खात्यांमधून लॉग आउट करा. त्यानंतर Hangouts पुन्हा उघडा आणि पुन्हा एकदा साइन इन करा.
OS शी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याचे आणखी उपाय
 • Android 4.1 – 4.4
  • तुमच्या फोनच्या सेटिंग्ज ॲपमध्ये डेटा वापर > मेनू आयकॉन > डेटा आपोआप सिंक करा येथे जाऊन 'डेटा आपोआप सिंक करा' सुरू वर सेट केलेले आहे याची खात्री करा.
  • तुमच्या फोनच्या सेटिंग्ज ॲपमध्ये वाय-फाय > मेनू आयकॉन > प्रगत > वाय-फाय ऑप्टिमायझेशन येथे जाऊन 'वाय-फाय ऑप्टिमायझेशन' बंद वर सेट केलेले आहे याची खात्री करून घ्या.
 • Android 6.0+
  • तुम्ही तुमच्या सेटिंग्ज ॲपमध्ये आवाज > व्यत्यय नको येथे 'व्यत्यय नको' बंद ठेवलेले आहे किंवा WhatsApp नोटिफिकेशन्सना प्राधान्य मोडमध्ये अनुमती दिलेली आहे याची खात्री करून घ्या.
  • तुमच्या फोनच्या सेटिंग्ज ॲपमध्ये ॲप्स > WhatsApp > परवानग्या येथे WhatsApp ला लागणारी परवानगी दिलेली आहे याची खात्री करून घ्या.
वर दिलेल्या कोणत्याही पायरीने समस्येचे निराकरण न झाल्यास तुम्हाला Google च्या पुश नोटिफिकेशन सर्व्हिसकडून अपडेट्स मिळत नाही आहेत असे असू शकते.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही