रूटेड फोन्स आणि कस्टम ROMs यांविषयी माहिती

Android
WhatsApp हे ॲप कस्टम ROMs आणि रूटेड फोन्सना सपोर्ट करत नाही. या कस्टमायझेशन्समध्ये इतके वेगवेगळे प्रकार असतात की त्यांना सपोर्ट करणे अवघड असते. शिवाय, कस्टम ROMs आणि रूटेड डिव्हाइसेसवर WhatsApp चे सुरक्षा मॉडेल अपेक्षेप्रमाणे काम करत नाही. तुम्ही कस्टम ROMs आणि रूटेड डिव्हाइसेस वापरत असाल, तर तुमच्या मेसेजेसना एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा लाभूनही इतर ॲप्सना तुमचे मेसेजेस वाचता येतात.
WhatsApp चा उत्तम अनुभव येण्यासाठी, कृपया stock ROM वापरा आणि रूट काढून टाका. तुमचा फोन अनरूट कसा करावा याबद्दलच्या सविस्तर सूचना मिळवण्यासाठी कृपया तुमच्या फोनच्या निर्मात्या कंपनीशी संपर्क साधा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही