एखाद्या बिझनेससोबत चॅट कसे करावे याविषयी माहिती

WhatsApp वर वैयक्तिक खाते आणि बिझनेस खाते यामधील फरक समजणे सोपे आहे. वैयक्तिक चॅटमध्ये, संपर्काच्या नावावर टॅप करून त्यांचे प्रोफाइल पहा. ते बिझनेस खाते असल्यास, त्यांच्या प्रोफाइलमध्ये खालीलपैकी एक लेबल असेल:
  • बिझनेस खाते: ही WhatsApp Business प्रॉडक्ट्स मध्ये मोडणाऱ्या एखाद्या प्रॉडक्टच्या बिझनेस खात्याची डीफॉल्ट स्थिती असते.
    • टीप: चॅट माहितीमध्ये बिझनेसचे नाव दृश्यमान असल्यास, त्याचा अर्थ WhatsApp ने हे खाते अधिकृत ब्रँड किंवा बिझनेसच्या मालकीचे असल्याचे निश्चित केले आहे असा होतो. तुम्ही त्या बिझनेसला तुमच्या ॲड्रेस बुकमध्ये जोडले नसले तरीही तुम्हाला त्याचे नाव दिसते.
  • अधिकृत बिझनेस खाते: WhatsApp ने असे निश्चित केले आहे, की हे खाते प्रसिद्ध आणि प्रमाणित ब्रॅंडच्या मालकीचे आहे. “अधिकृत व्यवसाय खात्याच्या” प्रोफाइलमध्ये आणि चॅटमधील शीर्षकाच्या बाजूला हिरवी बरोबरची खूण असते.
    • टीप: एखादे खाते "अधिकृत बिझनेस खाते" आहे याचा अर्थ WhatsApp त्यांच्या बिझनेसला समर्थन देते असा होत नाही. याचा अर्थ फक्त असा आहे, की तो बिझनेस इंटरनेटवरील सुप्रसिद्ध, अनेकदा शोधलेली व्यक्ती, ब्रँड किंवा संस्था यांचे प्रतिनिधित्व करतो.
मला माझ्या WhatsApp चॅट्समध्ये नवीन सिस्टीम मेसेज का दिसत आहे?
तुम्ही ज्या बिझनेसेससोबत WhatsApp वर चॅट करत आहात ते बिझनेसेस त्यांचे मेसेजेस व्यवस्थापित आणि स्टोअर करण्यात मदत व्हावी यासाठी Facebook किंवा इतर कंपन्यांचा वापर करू शकतात.
एखादा बिझनेस पुढील गोष्टी करण्याचा पर्याय निवडतो, तेव्हा तुम्हाला पुढील मेसेजेस दिसतील:
  • भागीदार वापरणे: "हे चॅट व्यवस्थापित करण्यासाठी हा बिझनेस इतर कंपन्यांसोबत काम करत आहे."
  • WhatsApp क्लाउड (Meta द्वारे होस्ट केलेले) वापरणे: "हे चॅट व्यवस्थापित करण्यासाठी हा बिझनेस Meta ची सुरक्षित सर्व्हिस वापरत आहे."
बिझनेसेस त्यांची चॅट्स स्वतःहून व्यवस्थापित करत असल्यास, तुम्हाला पुढील मेसेज दिसेल: "मेसेजेस आणि कॉल्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित आहेत. या चॅटमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींशिवाय इतर कोणीही, अगदी WhatsApp देखील ते वाचू किंवा ऐकू शकत नाही."
तुम्हाला कोणत्या जाहिराती दिसाव्यात हे ठरवण्यासाठी Meta तुमचे मेसेजेस ऑटोमॅटिकली वापरणार नाही, मात्र बिझनेसला त्यांना प्राप्त झालेले मेसेजेस/चॅट्स त्यांच्या मार्केटिंग व जाहिरातीसाठी वापरता येतील आणि त्यामध्ये Meta वरील जाहिरातीचाही समावेश असू शकतो.
एखाद्या बिझनेसने तुम्हाला मेसेज करू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्यांना थेट चॅटमधून ब्लॉक करू शकता किंवा तुमच्या संपर्क यादीतून हटवू शकता.
नेहमीच खाजगी आणि सुरक्षित
डिव्हाइसमधून मेसेज जाण्यापूर्वी मेसेज सुरक्षित करणाऱ्या सिग्नल एन्क्रिप्शन प्रोटोकॉलने प्रत्येक WhatsApp मेसेजला सुरक्षित केले जाते. तुम्ही एखाद्या WhatsApp Business खात्यास मेसेज करता, तेव्हा तुमचा मेसेज त्या बिझनेसने निवडलेल्या ठिकाणी सुरक्षितरीत्या पोहोचवला जातो.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही