WhatsApp Business काय आहे?

छोट्या बिझनेससाठी तयार करण्यात आलेले WhatsApp Business हे एक Android आणि iPhone ॲप आहे आणि ते निःशुल्क डाउनलोड करता येते. WhatsApp Business हे ॲप ग्राहकांकडून येणाऱ्या मेसेजेसना ऑटोमेट करण्यासाठी, त्यांना वर्गीकृत करण्यासाठी व त्यांना त्वरित उत्तर देण्यासाठी टूल्स पुरवून ग्राहकांसोबत संवाद साधणे सोपे करते. ते मुद्दामच WhatsApp Messenger च्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला Messenger वर सवय आहे त्याप्रमाणे मेसेजेस पाठवणे, फोटो पाठवणे अशाप्रकारेच तुम्ही हे ॲप वापरू शकता.
आम्ही सध्या ॲपमध्ये प्रदान करत असलेली काही फीचर्स खालीलप्रमाणे आहेत:
  • बिझनेस प्रोफाइल या फीचरच्या मदतीने तुमच्या ग्राहकांना तुमचा पत्ता, बिझनेसची माहिती, ईमेल ॲड्रेस आणि वेबसाइट याची माहिती मिळेल.
  • लेबल्स वापरून तुम्ही तुमची चॅट्स आणि मेसेजेसना संगतवार लावू शकता.
  • मेसेजिंग टूल्स वापरून तुम्ही ग्राहकांना झटपट प्रतिसाद देऊ शकता.
तुम्ही ते Google Play Store आणि App Store वरून कसे डाउनलोड करावे हे जाणून घेऊ शकता.
जर तुमचा एखादा बिझनेस नसेल तर, हे नवीन ॲप स्वतंत्रपणे डाउनलोड करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे नेहमीचे WhatsApp Messenger खाते वापरून तुमचा मित्रपरिवार, कुटुंबीय आणि बिझनेसेसशी संपर्कात राहू शकता.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही