ग्रुप ॲडमिन्स कसे व्यवस्थापित करावेत

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
ग्रुपमध्ये अनेक ग्रुप अ‍ॅडमिन्स असू शकतात आणि कोणताही अ‍ॅडमिन कोणत्याही सहभागी सदस्याला ॲडमिन करू शकतो. ग्रुपच्या निर्माणकर्त्याला काढून टाकले जाऊ शकत नाही आणि जोपर्यंत ते ग्रुप सोडत नाहीत तोपर्यंत ते ॲडमिन राहतात.
टीप: WhatsApp ग्रुपला ॲडमिनिस्ट्रेशन कार्यक्षमतांमध्ये हस्तक्षेप करता येत नाही. उदाहरणार्थ, आम्ही एखाद्या व्यक्तीला अ‍ॅडमिन करू शकत नाही.
सहभागी सदस्याला ॲडमिन बनवणे
  1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
    • किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, अधिक पर्याय
      > ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
  2. तुम्हाला ज्या सदस्याला ॲडमिन बनवायचे आहे त्याच्या नावावर टॅप करा.
  3. ग्रुप ॲडमिन करा वर टॅप करा.
एकाचवेळी अनेक सहभागी सदस्यांना ॲडमिन बनवणे
  1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
    • किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, अधिक पर्याय
      > ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
  2. ग्रुप सेटिंग्ज > ग्रुप ॲडमिन्स संपादित करा यावर टॅप करा.
  3. ज्याला ॲडमिन बनवायचे आहे त्या सहभागी सदस्यास निवडा.
  4. सर्व झाल्यावर हिरव्या बरोबरच्या खुणेवर टॅप करा.
ॲडमिनला पदावरून हटवणे
  1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
    • किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, अधिक पर्याय
      > ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
  2. ज्यांना ॲडमिन पदावरून हटवायचे आहे त्यांची निवड रद्द करा.
  3. ॲडमिन म्हणून काढून टाका वर टॅप करा.
एकावेळी अनेकांना ॲडमिन पदावरून हटवणे
  1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
    • किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, अधिक पर्याय
      > ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
  2. ग्रुप सेटिंग्ज > ग्रुप ॲडमिन्स संपादित करा यावर टॅप करा.
  3. ज्यांना ॲडमिन पदावरून हटवायचे आहे त्या सदस्यांची निवड रद्द करा.
  4. सर्व झाल्यावर हिरव्या बरोबरच्या खुणेवर टॅप करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही