मला WhatsApp कॉलिंग मध्ये काही समस्या का येत आहेत?

जेव्हा WhatsApp कॉल मध्ये समस्या येत असतील तेव्हा कृपया दुसऱ्या नेटवर्कला (जसे की मोबाईल डेटा ऐवजी वाय-फाय कनेक्शन वापरणे किंवा वाय-फाय ऐवजी मोबाईल डेटा वापरणे) कनेक्ट करून बघा. तुमचे सध्याचे नेटवर्क UDP (User Datagram Protocol) साठी योग्यप्रकारे सेट केलेले नसेल ज्यामुळे कदाचित WhatsApp कॉलिंग सुरळीतपणे कार्य करत नसेल.
जर तुमच्या वाय-फाय ला कनेक्ट केल्यानंतर WhatsApp कॉल्स करणे किंवा ते प्राप्त करणे यामध्ये समस्या येत असेल तर खात्री करून घ्या की तुमच्या राउटरची सुरक्षा सेटिंग्ज आणि फायरवॉलचे सेटिंग्ज योग्य प्रकारे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे कोणतेही विशिष्ट प्रकारचे कनेक्शन ब्लॉक केले जात नाहीयेत ना ज्यामुळे WhatsApp कॉल्स सुरळीतपणे कार्य करत नसतील.
जर तुम्हाला UDP आणि फायरवॉल सेटिंग्जबद्दल काही प्रश्न असतील तर तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी किंवा नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटरशी अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
तुमचे बॅटरी सेव्हर आणि ब्लु टूथ कनेक्शन हेदेखील तुमच्या WhatsApp कॉलिंग मध्ये अडथळा निर्माण करण्यास कारणीभूत असू शकतात. जर तुमचे बॅटरी सेव्हर चालू असेल किंवा ब्लु टूथ जोडलेले असेल तर ते अक्षम करून बघा. तुम्हाला अजूनही अडचणी येत असतील तर आमच्याशी संपर्क साधा.
तसेच, कृपया तुमचे डिव्हाइस परत सुरु करून बघा आणि खात्री करून घ्या इतर दुसरे एखादे ॲप्लिकेशन तुमचा मायक्रोफोन, हेडफोन उपकरण किंवा कॅमेरा वापरत नाहीये. तुम्हाला WhatsApp प्रमाणेच इतर ॲप्लिकेशन वापरत असताना देखील अशाच समस्या येत आहेत का हे आम्हाला कळवा.
हे मदतीचे होते का?
होय
नाही