Portal मध्ये तुमचे WhatsApp खाते कसे जोडावे किंवा त्यामधून कसे काढावे

तुमचे खाते जोडणे
टीप: तुम्ही तुमचे WhatsApp खाते Portal वर जोडायचे ठरवल्यास तुमचे संपर्क Facebook सोबत शेअर केले जात नाहीत. त्याऐवजी, ते Portal डिव्हाइसवर स्टोअर केले जातात.
 1. तुमच्या Portal वर, सेटिंग्ज > खाती > तुमचे नाव > WhatsApp कनेक्ट करा वर टॅप करा किंवा निवडा. त्यानंतर तुम्हाला Facebook मध्ये लॉग इन करण्यासाठी लागणारा कोड दिसेल.
 2. तुमच्या फोनच्या किंवा कॉंप्युटरच्या ब्राउझरवर facebook.com/device उघडा. त्यानंतर खालील डिव्हाइसेसवर हे करा:
  • फोन: कोड एंटर करा वर टॅप करा. कोड एंटर केल्यावर पुढे सुरू ठेवा > कन्फर्म करा यावर टॅप करा.
  • कॉंप्युटर: कोड एंटर केल्यानंतर पुढे सुरू ठेवा > कन्फर्म करा यावर क्लिक करा.
 3. तुमच्या Portal वर, बरोबरची खूण करून तुम्ही Portal वरून WhatsApp वर मेसेजेस प्राप्त करण्यास सहमती देता यावर बरोबरची खूण करा.
 4. पुढे सुरू ठेवा > पुढील यावर टॅप करा किंवा निवडा.
 5. तुमच्या फोनवर WhatsApp उघडा.
  • Android असल्यास: अधिक पर्याय
   > लिंक केलेली डिव्हाइसेस > डिव्हाइस लिंक करा यावर टॅप करा. तुमच्या डिव्हाइसमध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन असल्यास स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा. तुमचे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरू नसल्यास, तुम्ही फोन अनलॉक करण्यासाठी वापरता तो पिन एंटर करण्यास सांगितले जाईल.
  • iPhone असल्यास: WhatsApp च्या सेटिंग्ज मध्ये जा > लिंक केलेली डिव्हाइसेस > डिव्हाइस लिंक करा > ठीक आहे यावर टॅप करा. iOS 14 किंवा त्यानंतरची आवृत्ती असेल, तर अनलॉक करण्यासाठी 'टच आयडी' किंवा 'फेस आयडी' वापरा. तुमचे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरू नसल्यास, तुम्ही फोन अनलॉक करण्यासाठी वापरता तो पिन एंटर करण्यास सांगितले जाईल.
 6. तुमच्या Portal वर दिसणारा QR कोड तुमच्या फोनने स्कॅन करा.
 7. तुमच्या Portal वर पूर्ण झाले वर टॅप करा किंवा निवडा.
टीप: तुमच्या डिव्हाइसमध्ये स्टोअर असलेली बायोमेट्रिक्स वापरून ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे ऑथेंटिकेशन केले जाते. WhatsApp तुमच्या डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टीमने स्टोअर केलेली बायोमेट्रिक माहिती मिळवू शकत नाही.
तुमचे खाते काढून टाकणे
 1. तुमच्या Portal वर, सेटिंग्ज > खाती > तुमचे नाव > WhatsApp > खाते काढून टाका वर टॅप करा किंवा निवडा.
 2. तुमच्या फोनवर WhatsApp उघडा किंवा तुमच्या कॉंप्युटरवर WhatsApp वेब किंवा WhatsApp डेस्कटॉप उघडा.
 3. पाठवण्यात आलेला कन्फर्मेशन कोड पाहण्यासाठी "Portal from Facebook" मध्ये वैयक्तिक चॅट उघडा.
 4. तुमच्या Portal वर कन्फर्मेशन कोड एंटर करा आणि त्यानंतर पूर्ण झाले > काढून टाका वर टॅप करा किंवा निवडा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही