तुमचे WhatsApp खाते कसे हटवावे

तुम्ही तुमचे खाते WhatsApp मधून हटवू शकता. खाते हटवणे ही एक अशी प्रक्रिया आहे जी मागे घेता येत नाही, तुमच्याकडून ते चुकून झाले असले तरीही.
तुमचे WhatsApp खाते हटवण्यासाठी:
  1. WhatsApp उघडा.
  2. अधिक पर्याय
    > सेटिंग्ज > खाते > माझे खाते हटवा वर टॅप करा.
  3. तुमचा फोन नंबर पूर्ण आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये एंटर करा आणि माझे खाते हटवा वर टॅप करा.
  4. तुम्ही तुमचे खाते का हटवत आहात याचे कारण खाली येणाऱ्या पर्यायांमधून निवडा.
  5. माझे खाते हटवा वर टॅप करा.
खाते हटवल्याने हे होईल:
  • तुमचे खाते WhatsApp मधून काढून टाकले जाईल.
  • तुमचे पूर्वीचे मेसेजेस हटवले जातील.
  • तुम्हाला तुमच्या सर्व WhatsApp ग्रुप्समधून काढून टाकले जाईल.
  • तुमचा Google ड्राइव्ह बॅकअप हटवला जाईल.
तुम्ही तुमचे खाते हटविल्यानंतर:
  • तुम्ही तुमचे खाते पुन्हा वापरू शकणार नाही.
  • तुमची WhatsApp माहिती हटवण्याची प्रक्रिया सुरू होऊन ती पूर्ण होण्यासाठी नव्वद दिवसांचा कालावधी लागू शकतो. तांत्रिक अडचणी, सॉफ्टवेअरमधील त्रुटी किंवा डेटा नष्ट होणे अशा काही कारणांमुळे नव्वद दिवसांनंतरही तुमचा डेटा बॅकअप स्टोरेजमध्ये राखून ठेवला जाऊ शकतो. या काळात तुमची माहिती WhatsApp वर उपलब्ध नसते.
  • तुम्ही तयार केलेल्या ग्रुपशी संबंधित माहितीवर किंवा इतर वापरकर्त्यांकडील तुम्ही त्यांना पाठवलेल्या मेसेजेसची कॉपी यासारख्या तुमच्याशी संबंधित असलेल्या माहितीवर याचा परिणाम होत नाही.
  • तुम्ही तुमचे खाते हटवल्यानंतरदेखील आम्ही ठरावीक लॉग डेटा आमच्या डेटाबेसेसमध्ये राखून ठेवू शकतो. पण हा डेटा ओळख दर्शवणाऱ्या कोणत्याही माहितीपासून वेगळा केला जाईल, जेणेकरून तिथून पुढे तो तुमच्या खात्याशी जोडला जाऊ शकणार नाही. हे करण्यासाठी, ओळख दर्शवणारी ठरावीक माहिती आम्ही या लॉग डेटामधून नियमितपणे पुसून टाकतो आणि तुमच्या खाते आयडीच्या जागी एक आयडेंटिफायर ठेवतो, जो एकदा हटवल्यानंतर पुन्हा तुमच्या खात्याशी लिंक केला जाऊ शकत नाही.
  • कायदेशीर समस्या, अटींचे उल्लंघन या कारणांसाठी किंवा हानीस प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने आम्ही तुमची माहिती जतन करून ठेवू शकतो.
  • अधिक माहितीसाठी, कृपया आमचे गोपनीयता धोरण पहा.
  • तुम्ही इतर Meta कंपन्यांसोबत शेअर केलेली माहितीदेखील हटवली जाईल.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर तुमचे खाते कसे हटवावे हे जाणून घ्या: iPhone | KaiOS
हे मदतीचे होते का?
होय
नाही