‘चॅट करण्यासाठी क्लिक करा’ वापरणे

WhatsApp चे ‘चॅट करण्यासाठी क्लिक करा’ हे फीचर वापरून तुम्ही तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये नसलेल्या व्यक्तीसोबतही चॅट सुरू करू शकता. तुम्हाला त्या व्यक्तीचा फोन नंबर माहीत असेल आणि त्यांच्याकडे सुरू असलेले WhatsApp खाते असेल, तर तुम्ही एक लिंक तयार करून त्या व्यक्तीसोबत चॅट सुरू करू शकता. ही लिंक उघडल्यावर त्या व्यक्तीसोबतचे चॅट आपोआपच सुरू होते. ‘चॅट करण्यासाठी क्लिक करा’ हे फीचर फोन आणि WhatsApp वेब दोन्हीवर चालते.
स्वतःची लिंक तयार करणे
https://wa.me/<number> वर <number> हा आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधील पूर्ण फोन नंबर वापरा. आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये फोन नंबर जोडताना फोन नंबरमध्ये अतिरिक्त शून्य, कंस किंवा जोडरेषा लावू नका.
उदाहरणे:
वापरा: https://wa.me/1XXXXXXXXXX
वापरू नका: https://wa.me/+001-(XXX)XXXXXXX
तुमची स्वत:ची, आधीपासून लिहिलेला मजकूर असलेली लिंक तयार करणे
आधीपासून लिहीलेला तो मजकूर चॅटमधील मेसेज लिहिण्याच्या जागेमध्ये आपोआप दिसेल. https://wa.me/whatsappphonenumber/?text=urlencodedtext वर whatsappphonenumber हा आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधील पूर्ण फोन नंबर आणि urlencodedtext हा आधीपासून भरलेला URL-एन्कोडेड मेसेज वापरा.
उदाहरणार्थ: https://wa.me/1XXXXXXXXXX?text=I'm%20interested%20in%20your%20car%20for%20sale
फक्त आधीपासून भरलेला मजकूर वापरून लिंक तयार करण्यासाठी, https://wa.me/?text=urlencodedtext वापरा
उदाहरणार्थ: https://wa.me/?text=I'm%20inquiring%20about%20the%20apartment%20listing
लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या संपर्कांना मेसेज पाठवू शकता याची यादी दिसेल.
'WhatsApp वर चॅट करा' बटण कसे वापरावे
ब्रॅंडेड 'WhatsApp वर चॅट करा' बटण ब्रँडविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते. ब्रँडविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याने हे बटण तुमच्याशी संवाद साधू इच्छिणाऱ्या संभाव्य ग्राहकांच्या ओळखीचे आणि त्यांच्या विश्वासास पात्र बनेल. WhatsApp वर चॅट करा' बटण हिरव्या आणि पांढऱ्या रंगात तसेच लहान, मध्यम व मोठे अशा तीन वेगवेगळ्या आकारांमध्ये उपलब्ध आहे.
अधिकृत 'WhatsApp वर चॅट करा' बटण कसे दिसते याची दोन उदाहरणे खाली दिली आहेत:
टीप: 'WhatsApp वर चॅट करा' बटण सध्या फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.
'WhatsApp वर चॅट करा' बटण वापरून अधिकाधिक ग्राहकांना संवादास उत्तेजन देण्यासाठी या सर्वोत्तम पद्धतींचे पालन करा:
तुम्ही 'WhatsApp वर चॅट करा' बटण अनेक ठिकाणी वापरू शकता, जसे की:
  • डेस्कटॉप ब्राउझरवरील लॅंडिग पेजेस
  • संपर्क पेजेस
  • मोबाइल ॲप्स
  • तुमच्या वेबसाइटची मोबाइल आवृत्ती
  • तृतीय पक्ष डेव्हलपर्सकडील टेंप्लेट्स
HTML कोडची उदाहरणे
  • SVG इमेज एम्बेड करण्यासाठी:
  • <a aria-label="Chat on WhatsApp" href="https://wa.me/1XXXXXXXXXX"><img alt="Chat on WhatsApp" src="WhatsAppButtonGreenLarge.svg" />
    <a />
  • PNG इमेज एम्बेड करण्यासाठी
  • <a aria-label="Chat on WhatsApp" href="https://wa.me/1XXXXXXXXXX"><img alt="Chat on WhatsApp" src="WhatsAppButtonGreenLarge.png" />
    <a />
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही