Google ड्राइव्ह बॅकअप तयार किंवा रिस्टोअर करता न येणे

Android
WhatsApp ला एखादा बॅकअप सापडत नसल्यास, त्याची कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात:
 • तुम्ही बॅकअप घेण्यासाठी जे Google खाते वापरले, त्या खात्यामधून लॉग इन केलेले नाही.
 • तुम्ही ज्या फोन नंबरवर बॅकअप घेतला होता, तो नंबर वापरत नाही आहात.
 • तुमचे SD कार्ड किंवा पूर्वीचे चॅट करप्ट झाले आहे.
 • Google ड्राइव्ह खात्यावर किंवा तुमच्या डिव्हाइसच्या स्टोरेजमध्ये बॅकअप फाइल अस्तित्वात नाही.
Google ड्राइव्ह बॅकअप तयार करता न येणे
Google ड्राइव्ह बॅकअप तयार करताना समस्या येत असल्यास, कृपया खालील गोष्टी करा:
 • तुमच्या डिव्हाइसमध्ये Google खाते जोडले आहे याची खात्री करून घ्या.
 • तुमच्या फोनवर Google Play सर्व्हिसेस हे पॅकेज इंस्टॉल केले आहे याची खात्री करून घ्या.
 • तुम्ही मोबाइल डेटा वापरून बॅकअप घेण्याचा प्रयत्न करत असल्यास, तुमच्याकडे WhatsApp आणि Google Play सर्व्हिसेस या दोन्हीसाठी डेटा आहे याची खात्री करून घ्या. तुम्हाला खात्री नसल्यास तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क साधा.
 • वेगळ्या नेटवर्कवरून बॅकअप घेऊन पहा. मोबाइल डेटा वापरून बॅकअप घेता न आल्यास वाय-फाय नेटवर्कला कनेक्ट करून पहा.
Google ड्राइव्ह बॅकअप रिस्टोअर करता न येणे
Google ड्राइव्ह बॅकअप रिस्टोअर करताना समस्या येत असल्यास, कृपया खालील गोष्टी करा:
 • तुम्ही ज्या फोन नंबरवर बॅकअप घेतला होता त्याच फोन नंबरवर बॅकअप रिस्टोअर करायचा प्रयत्न करत आहात याची खात्री करून घ्या.
 • तुम्ही एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअप रिस्टोअर करत असल्यास, तुम्ही योग्य पासवर्ड किंवा की वापरात आहात याची खात्री करून घ्या.
 • बॅकअप रिस्टोअर करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसवर पुरेशी मोकळी जागा आहे याची खात्री करून घ्या.
 • तुमच्या फोनवर Google Play सर्व्हिसेस हे पॅकेज इंस्टॉल केले आहे याची खात्री करून घ्या.
 • तुमच्या डिव्हाइसची बॅटरी पूर्णपणे चार्ज केलेली आहे किंवा तुमचे डिव्हाइस चार्जिंगला लावले आहे याची खात्री करून घ्या.
 • तुमच्या डिव्हाइसचे इंटरनेट कनेक्शन वेगवान आणि स्थिर आहे याची खात्री करून घ्या. मोबाइल डेटा नेटवर्क वापरून बॅकअप रिस्टोअर होत नसल्यास, कृपया वाय-फाय नेटवर्क वापरून पहा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही