तुमचे प्रोफाइल कसे संपादित करावे

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुमच्या प्रोफाइल फोटोमध्ये बदल करणे
  1. WhatsApp उघडा.
  2. पर्याय > सेटिंग्ज > प्रोफाइल यावर प्रेस करा.
  3. प्रोफाइल फोटो निवडा.
  4. त्यानंतर हे करा:
    • सध्या प्रोफाइल फोटो लावलेला असल्यास अधिक वर प्रेस करा. यानंतर तुम्ही तुमचा फोटो पाहू शकता, कॅमेऱ्याने फोटो घेण्यासाठी किंवा गॅलरी मधून एखादा फोटो निवडण्यासाठी संपादित करा निवडू शकता किंवा तुमचा फोटो काढून टाकू शकता.
    • सध्या प्रोफाइल फोटो लावलेला नसल्यास जोडा वर प्रेस करा. तुम्ही कॅमेऱ्याने फोटो घेऊ शकता किंवा गॅलरी मधून एखादा फोटो निवडू शकता.
तुमच्या प्रोफाइल नावात बदल करणे
  1. WhatsApp उघडा.
  2. पर्याय > सेटिंग्ज > प्रोफाइल यावर प्रेस करा.
  3. नाव निवडा.
  4. संपादित करा वर प्रेस करा आणि तुमचे नवीन नाव लिहा.
    • तुमच्या नावामध्ये जास्तीत जास्त २५ कॅरेक्टर्स असू शकतात.
  5. सेव्ह करा वर प्रेस करा.
ग्रुप्समधील ज्या वापरकर्त्यांच्या ॲड्रेस बुकमध्ये तुमचा संपर्क आणि संपर्क माहिती समाविष्ट नाही, त्यांना तुमचे हे प्रोफाइल नाव दिसेल.
'माझ्याबद्दल' मध्ये बदल करणे
  1. WhatsApp उघडा.
  2. पर्याय > सेटिंग्ज > प्रोफाइल यावर प्रेस करा.
  3. माझ्याबद्दल निवडा.
  4. संपादित करा वर प्रेस करा आणि 'माझ्याबद्दल' मध्ये नवी माहिती लिहा.
    • 'माझ्याबद्दल' मध्ये लिहिलेल्या मजकुरात जास्तीत जास्त १३९ कॅरेक्टर्स असू शकतात.
    • 'माझ्याबद्दल' हे फील्ड रिकामे ठेवता येणार नाही.
  5. सेव्ह करा वर प्रेस करा.
टीप:
  • तुमचा प्रोफाइल फोटो आणि 'माझ्याबद्दल' कोण पाहू शकते हे तुम्ही तुमच्या गोपनीयता सेटिंग्जमधून नियंत्रित करू शकता.
  • तुम्ही एखाद्या संपर्कास ब्लॉक केले असेल तर त्या व्यक्तीला तुमच्या प्रोफाइल फोटोमध्ये किंवा 'माझ्याबद्दल' मध्ये केलेले बदल दिसणार नाहीत.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही