लिंक केलेल्या डिव्हाइसेसविषयी माहिती

तुमच्या फोनशी इतर डिव्हाइसेस लिंक करून ती WhatsApp वेब आणि डेस्कटॉपवर वापरता येतात. तुम्ही एका वेळी कमाल चार लिंक केलेली डिव्हाइसेस आणि एक फोन वापरू शकता.
तुमचे वैयक्तिक मेसेजेस, मीडिया फाइल्स आणि कॉल्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्ट केलेले असतात. WhatsApp वापरणाऱ्या लोकांच्या अपेक्षेनुसार, एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनद्वारे गोपनीयता व सुरक्षेची समान पातळी राखून लिंक केलेले प्रत्येक डिव्‍हाइस WhatsApp शी स्‍वतंत्रपणे कनेक्‍ट होते.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनविषयी या लेखामध्ये अधिक जाणून घ्‍या. आम्ही तुमचा डेटा कशाप्रकारे गोळा करतो, शेअर करतो आणि त्यावर कशाप्रकारे प्रक्रिया करतो याविषयी माहिती मिळवण्यासाठी कृपया WhatsApp चे गोपनीयता धोरण पहा.
टीप:
  • लिंक केलेल्या डिव्‍हाइसेसवर WhatsApp वापरण्‍यासाठी तुमचा फोन ऑनलाइन असण्याची आवश्‍यकता नाही, परंतु तुम्‍ही १४ दिवसांहून अधिक कालावधीकरिता तुमचा फोन न वापरल्‍यास तुमची लिंक केलेली डिव्हाइसेस लॉग आउट केली जातील.
  • तुमच्या WhatsApp खात्याची नोंदणी करण्यासाठी आणि नवीन डिव्हाइसेस लिंक करण्यासाठी तुमच्याकडे तुमचा फोन असणे आवश्यक आहे.
सपोर्ट नसलेली फीचर्स
या फीचर्सना सध्या WhatsApp वेब आणि डेस्कटॉपवर सपोर्ट नाही:
  • लाईव्ह लोकेशन पाहणे.
  • ब्रॉडकास्ट लिस्ट्स तयार करणे आणि त्या पाहणे.
तुमचे खाते आणखी सुरक्षित ठेवणे
  • तुमच्या फोनवर पुश नोटिफिकेशन्स सुरू करा. पुश नोटिफिकेशन्स सुरू करून तुम्ही तुमच्या ओळखीची नसलेली डिव्हाइसेस तुमच्या खात्याशी लिंक केली जाणाऱ्या डिव्हाइसेसमधून काढू शकता. डिव्हाइस तुमच्या ओळखीचे नसल्यास, त्याचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि ते काढण्यासाठी नोटिफिकेशनवर टॅप करा.
  • तुमची लिंक केलेली डिव्हाइसेस नियमितपणे तपासा. तुमच्या खात्याशी लिंक केलेली सर्व डिव्हाइसेस पाहण्यासाठी, WhatsApp सेटिंग्ज > लिंक केलेली डिव्हाइसेस यावर जा. लिंक केलेल्या डिव्हाइसवरून लॉग आउट करण्यासाठी, डिव्हाइस > लॉग आउट करा यावर टॅप करा. ३० दिवसांच्या निष्क्रियतेनंतर आम्ही लिंक केलेली डिव्हाइसेस आपोआप डिस्कनेक्टदेखील करू.
  • तुमच्या खात्याशी नवीन डिव्हाइस लिंक करण्यासाठी तुम्ही WhatApp QR कोड स्कॅन करणे आवश्यक आहे. त्यामुळे, फक्त WhatsApp वेब, WhatsApp डेस्कटॉप, Portal from Meta, किंवा Ray-Ban Stories यांवर QR कोड स्कॅन करा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही