लाईव्ह लोकेशन कसे वापरावे

Android
iPhone
लाईव्ह लोकेशन हे फीचर वापरून तुम्ही सध्या कुठे आहात ते वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमधील सदस्यांसोबत ठरावीक काळासाठी शेअर करू शकता. तुम्ही तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करायचे की नाही किंवा किती काळ शेअर करायचे हे नियंत्रित करू शकता. तसेच तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करणे तुम्ही कधीही थांबवू शकता. तुम्ही ते थांबवले किंवा ते कालबाह्य झाले, तर त्यानंतर तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर केले जाणार नाही. तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर केलेल्या व्यक्तींना स्थिर थंबनेल इमेज म्हणून तुमचे लोकेशन दिसत राहील आणि तुमचे शेवटी अपडेट केलेले लोकेशन पाहण्यासाठी तुम्ही इमेजवर टॅप करू शकता.
हे फीचर एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले आहे. याचाच अर्थ, तुमचे लाईव्ह लोकेशन तुम्ही ज्या व्यक्तींबरोबर शेअर केले आहे, फक्त त्यांनाच ते दिसेल, इतर कोणालाही नाही. WhatsApp वरील सुरक्षेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया WhatsApp सुरक्षितता पेजला भेट द्या. WhatsApp वर गोपनीयता कशी जपली जाते याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे गोपनीयता धोरणही वाचू शकता.
तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करणे
 1. तुमच्या फोनमध्ये Settings
  वर जा आणि Privacy > Location Services > WhatsApp > Always मध्ये WhatsApp साठीच्या लोकेशन परवानग्या सुरू करा. किवा, तुमच्या फोनमध्ये Settings
  > WhatsApp > Location > Always असे सेट करा.
 2. वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
 3. अटॅच करा
  > लोकेशन > लाईव्ह लोकेशन शेअर करा यावर टॅप करा.
 4. तुम्हाला जेवढ्या कालावधीसाठी तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करायचे आहे तो कालावधी निवडा. निवडलेल्या कालावधीनंतर तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर होणे बंद होईल.
  • तुम्हाला हवे असल्यास, टिप्पणी जोडा.
 5. पाठवा
  वर टॅप करा.
लाईव्ह लोकेशन शेअर करणे थांबवणे
विशिष्ट वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करणे थांबवणे
 1. वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
 2. शेअर करणे थांबवा > शेअर करणे थांबवा यावर टॅप करा.
सर्व वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करणे थांबवणे
 1. WhatsApp वर सेटिंग्ज > गोपनीयता > लाईव्ह लोकेशन येथे जा.
 2. शेअर करणे थांबवा > शेअर करणे थांबवा यावर टॅप करा.
टीप:
 • तुमच्या फोनच्या Settings
  > Privacy > Location Services > WhatsApp > Never वर जाऊन तुम्ही कधीही WhatsApp साठीच्या लोकेशन परवानग्या बंद करू शकता.
 • किंवा, तुमच्या फोनमध्ये Settings
  > WhatsApp > Location > Never असे सेट करा.
संबंधित लेख:
Android वर लाईव्ह लोकेशन कसे वापरायचे
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही