व्हॉइस मेसेजेस कसे पाठवावेत

तुम्हाला एखादा मेसेज टाइप करून पाठवायची इच्छा नसेल, तर तुम्ही तो रेकॉर्ड करून व्हॉइस मेसेजच्या रूपात पाठवू शकता.
व्हॉइस मेसेज पाठवणे
 1. तुम्हाला ज्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटला मेसेज पाठवायचा आहे ते चॅट उघडा.
 2. तुम्ही मेसेज लिहिण्यासाठी असलेला बॉक्स निवडला आहे याची खात्री करून घ्या.
 3. व्हॉइस > व्हॉइस वर प्रेस करा आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करण्यास सुरुवात करा.
 4. रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी थांबवा वर प्रेस करा.
 5. त्यानंतर हे करा:
  • व्हॉइस मेसेज ऐकण्यासाठी प्ले करा वर प्रेस करा.
  • व्हॉइस मेसेज पाठवण्यासाठी पाठवा वर प्रेस करा.
  • व्हॉइस मेसेज हटवण्यासाठी हटवा वर प्रेस करा.
टीप: रेकॉर्डिंग करताना तुमचे सुरुवातीचे बोलणे रेकॉर्ड झाले नाही असे होऊ शकते. त्यामुळे, रेकॉर्डिंग सुरू केल्यानंतर काही सेकंद थांबून मग बोलण्यास सुरुवात करा.
पाठवलेल्या व्हॉइस मेसेजेसवर तुम्हाला हे दिसेल:
 • तुम्ही ज्या व्यक्तीला व्हॉइस मेसेज पाठवला आहे त्या व्यक्तीने व्हॉइस मेसेज अद्याप ऐकला नसल्यास त्यावर हिरवा मायक्रोफोन
  दिसेल.
 • तुम्ही ज्या व्यक्तीला व्हॉइस मेसेज पाठवला आहे त्या व्यक्तीने व्हॉइस मेसेज ऐकला असल्यास त्यावर निळा मायक्रोफोन
  दिसेल.
टीप: खालील व्हिडिओ फक्त JioPhone किंवा JioPhone 2 असणाऱ्या WhatsApp वापरकर्त्यांसाठीच आहे.

संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय