डेस्कटॉप कॉलिंग वापरू शकत नाही

वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुम्हाला डेस्कटॉप कॉल्स करण्यात किंवा घेण्यात समस्या येत असल्यास:
  • तुमचा कॉंप्युटर व फोन इंटरनेटला कनेक्ट असल्याची आणि इंटरनेट कनेक्शन वेगवान असल्याची खात्री करून घ्या.
  • WhatsApp अपडेट करून उपलब्ध नवीनतम आवृत्ती वापरा.
  • तुमचे डिव्हाइस डेस्कटॉप कॉलिंगला सपोर्ट करते याची खात्री करा. डेस्कटॉप कॉलिंग Windows 10 64-bit आवृत्ती 1903 आणि त्यापुढील आवृत्ती तसेच macOS 10.13 आणि त्यापुढील आवृत्तीवर उपलब्ध आहे.
  • तुमच्यापाशी मायक्रोफोन, कॅमेरा आणि स्पीकर्स असल्याची खात्री करा.
  • तुमच्या कॉंप्युटरच्या साउंड सेटिंग्जमधून तुमच्या मायक्रोफोनचे आणि स्पीकर्सचे ट्रबलशूटिंग करा.
  • सर्वोत्तम आवाजासाठी हेडसेट वापरा. वेगळे बाह्य मायक्रोफोन आणि स्पीकर डिव्हाइसेस वापरल्याने प्रतिध्वनी निर्माण होऊ शकतो.
  • तुमचा कॅमेरा सुरू असल्याची खात्री करा.
  • तुम्ही WhatsApp ला तुमचा मायक्रोफोन आणि कॅमेरा वापरण्याची परवानगी दिली असल्याची खात्री करा.
टीप:
  • WhatsApp डेस्कटॉपवर सध्या ग्रुप कॉल्स करता येत नाहीत.
  • व्हर्च्युअल ऑडिओ आणि व्हिडिओ डिव्हाइसेसना सपोर्ट नाही.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही