लेबल्स कशी वापरावीत

लेबल्स तुम्हाला तुमची चॅट्स आणि मेसेजेस संगतवार लावण्यात व झटपट शोधण्यात मदत करू शकतात. तुम्ही विविध रंगांची किंवा नावांची लेबल्स तयार करू शकता, तसेच संपूर्ण चॅट किंवा चॅटमधील काही विशिष्ट मेसेजेससाठी लेबल जोडू शकता.
लेबल्स तयार करणे
 1. WhatsApp Business ॲप उघडा.
 2. चॅट्स > अधिक पर्याय
  > लेबल्स यावर टॅप करा.
 3. जोडा वर टॅप करा > लेबलचे नाव एंटर करा > ठीक आहे वर टॅप करा.
टीप: तुम्ही कमाल २० लेबल्स समाविष्ट करू शकता.
चॅटला लेबल्स जोडणे
 1. WhatsApp Business ॲप उघडा.
 2. चॅटवर टॅप करून धरून ठेवा > लेबल
  वर टॅप करा.
 3. हवी असलेली लेबल्स निवडा > सेव्ह करा वर टॅप करा.
मेसेजला लेबल जोडणे
 1. WhatsApp Business ॲप उघडा.
 2. मेसेजवर टॅप करून धरून ठेवा > अधिक पर्याय
  > मेसेजला लेबल जोडा यावर टॅप करा.
 3. हवी असलेली लेबल्स निवडा > सेव्ह करा वर टॅप करा.
टीप: चॅट किंवा मेसेजला एकाहून अधिक लेबल्स जोडल्यास, लेबल्स स्टॅक केलेल्या रूपात दिसतील.
लेबल जोडलेला आशय शोधणे
 1. WhatsApp Business ॲप उघडा.
 2. चॅट्स > अधिक पर्याय
  > लेबल्स यावर टॅप करा.
 3. लेबलवर टॅप करा.
एखाद्या चॅटशी संलग्न सर्व लेबल्स पाहण्यासाठी तुम्ही चॅट्स स्क्रीनवरून ग्राहकाच्या फोटोवर किंवा ग्रुप आयकॉनवरदेखील टॅप करू शकता.
लेबल्स व्यवस्थापित करणे
चॅट्स > अधिक पर्याय
> लेबल्स यावर टॅप करा. तुम्हाला व्यवस्थापित करायचे आहे त्या लेबलवर टॅप करा. तुम्ही पुढील बदल करू शकता:
 • लेबल संपादित करणे: लेबल > अधिक पर्याय
  > लेबल संपादित करा यावर टॅप करा.
 • लेबलचा रंग बदलणे: लेबल > अधिक पर्याय
  > रंग निवडा यावर टॅप करा.
 • लेबल हटवणे: लेबल > अधिक पर्याय
  > लेबल हटवा > होय यावर टॅप करा.
 • नवीन ब्रॉडकास्ट तयार करणे: लेबल > अधिक पर्याय
  > ग्राहकांना मेसेज करा यावर टॅप करा. तुमचा मेसेज तयार करून पाठवण्यासाठी बरोबरच्या खुणेवर
  टॅप करा.
  • टीप: लेबल्स वापरून तयार केलेले ब्रॉडकास्ट मेसेजेस ग्रुप्सना पाठवता येणार नाहीत. लेबल्स वापरून तयार केलेला ब्रॉडकास्ट मेसेज फक्त ग्राहकांना स्वतंत्रपणे मिळेल.
बिझनेसशी संबंधित टीप: "नवीन ग्राहक" आणि "पुन्हा आलेला ग्राहक" यांसारख्या चॅट्ससाठी लेबल्स तयार केल्यामुळे तुम्हाला तुमच्या ग्राहकांच्या खर्च करण्याच्या सवयींचा माग ठेवण्यात मदत होते.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय
नाही