तुमच्या खाते माहितीची विनंती कशी करावी

'खाते माहितीची विनंती करा' हे फीचर तुम्हाला तुमच्या WhatsApp खाते माहितीची व सेटिंग्जची विनंती करण्याची आणि त्याचा रिपोर्ट एक्स्पोर्ट करण्याची अनुमती देते. या रिपोर्टमध्ये तुमचे मेसेजेस समाविष्ट नसतील. तुम्हाला ॲपमधील मेसेजेसखेरिज इतर मेसेजेस हवे असतील तर तुम्हाला तुमचे पूर्वीचे चॅट एक्स्पोर्ट करावे लागेल.
हे फीचर WhatsApp वेब आणि डेस्कटॉपवर उपलब्ध नाही याची कृपया नोंद घ्या.
रिपोर्टची विनंती करा
  1. WhatsApp सेटिंग्ज > खाते > खाते माहितीची विनंती करा यावर जा.
  2. रिपोर्टची विनंती करा वर टॅप करा. त्यानंतर स्क्रीनवर विनंती पाठवली असे दिसेल.
विनंती केल्याच्या तारखेपासून सुमारे तीन दिवसांनी तुमचा रिपोर्ट उपलब्ध होईल. तुमचा रिपोर्ट कधी उपलब्ध होईल हे तुम्हाला या तारखेपर्यंत तयार होईल मध्ये दिलेल्या तारखेवरून कळू शकते.
टीप:
  • तुम्ही रिपोर्टची विनंती केली की ती मागे घेता येत नाही किंवा रद्द करता येत नाही.
  • तुम्ही तुमचा फोन नंबर बदललात किंवा तुमचे खाते हटवले, तर तुमची प्रलंबित विनंती आपोआपच रद्द होईल आणि तुम्हाला रिपोर्ट हवा असल्यास नव्याने विनंती करावी लागेल.
रिपोर्ट डाउनलोड करणे आणि एक्स्पोर्ट करणे
रिपोर्ट डाउनलोडसाठी उपलब्ध होईल तेव्हा तुम्हाला तसे कळवणारे WhatsApp नोटिफिकेशन मिळेल आणि त्यामध्ये हे लिहिलेले असेल: “तुमचा खाते रिपोर्ट आता उपलब्ध आहे”. रिपोर्ट उपलब्ध झाल्याच्या दिवसापासून तो आमच्या सर्व्हर्सवरून हटवला जाईपर्यंत किती आठवडे उपलब्ध असेल हे WhatsApp मधील खाते माहितीची विनंती करा या स्क्रीनवर दिसेल. या रिपोर्टमध्ये‍ तुमची वैयक्तिक माहिती असते, त्यामुळे हा रिपोर्ट इतर कोणत्याही सेवांवर स्टोअर करताना, पाठवताना किंवा अपलोड करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.
  1. WhatsApp सेटिंग्ज > खाते > खाते माहितीची विनंती करा यावर जा.
  2. रिपोर्ट डाउनलोड करा वर टॅप करा. तुमच्या फोनवर एक ZIP फाइल डाउनलोड होईल. त्या फाइलमध्ये HTML आणि JSON फाइल्स असतील.
  3. फाइल डाउनलोड झाल्यावर रिपोर्ट एक्स्पोर्ट करा > "एक्स्पोर्ट करा" यावर किंवा रिपोर्ट एक्स्पोर्ट करा वर टॅप करा. डाउनलोड केलेला रिपोर्ट तुम्हाला WhatsApp मध्ये पाहता येणार नाही.
  4. तुम्हाला ज्या ॲपवर हा रिपोर्ट एक्स्पोर्ट करायचा असेल ते ॲप शेअर ट्रेमधून निवडा. उदाहरणार्थ, तुम्ही रिपोर्टची एक प्रत स्वत:ला ईमेल करू शकता.
हा रिपोर्ट तुमच्या फोनवर डाउनलोड केल्यावर तुम्हाला ती डाउनलोड केलेली कॉपी कायमची हटवता येते. त्यासाठी खाते माहितीची विनंती करा स्क्रीनवरील, रिपोर्ट हटवा > "हटवा" यावर किंवा रिपोर्ट हटवा वर टॅप करा. रिपोर्ट हटवल्याने तुमच्या WhatsApp खात्यामधील कोणताही डेटा हटवला जाणार नाही.
संबंधित लेख:
  • KaiOS प्लॅटफॉर्मवर खाते माहितीची विनंती कशी करावी
  • पुढील प्लॅटफॉर्म्सवर पूर्वीचे चॅट कसे एक्स्पोर्ट करावे: Android | iPhone
हे मदतीचे होते का?
होय
नाही