व्हॉइस कॉल कसा करावा

व्हॉइस कॉलिंगमुळे तुम्ही कॉल करत असलेली व्यक्ती दुसऱ्या देशामध्ये असली तरीही WhatsApp वापरून तुम्ही त्यांना मोफत कॉल करू शकता. व्हॉइस कॉलिंग तुमच्या फोनच्या मोबाइल प्लॅनच्या मिनिटांऐवजी फोनमधील इंटरनेट कनेक्शन वापरते. त्यामुळे, डेटा शुल्क लागू शकते.
व्हॉइस कॉल करणे
 1. तुम्हाला ज्या संपर्काला व्हॉइस कॉल करायचा आहे त्या संपर्कासोबत वैयक्तिक चॅट सुरू करा.
 2. व्हॉइस कॉल
  वर टॅप करा.
किंवा तुम्ही हे करू शकता, WhatsApp उघडा त्यानंतर कॉल्स टॅब > नवीन कॉल
वर टॅप करा. तुम्हाला ज्या संपर्काला व्हॉइस कॉल करायचा आहे तो संपर्क शोधा, त्यानंतर व्हॉइस कॉल
वर टॅप करा.
व्हॉइस कॉल घेणे
तुमचा फोन लॉक असल्यास, कोणीतरी तुम्हाला व्हॉइस कॉल केल्यावर तुम्हाला इनकमिंग WhatsApp व्हॉइस कॉल स्क्रीन दिसेल, जेथे तुम्ही हे करू शकता:
 • चिन्हावर टॅप करून कॉल स्वीकारू शकता.
 • चिन्हावर टॅप करून कॉल नाकारू शकता.
 • चिन्हावर तात्काळ प्रत्युत्तर देऊन कॉल नाकारू शकता.
तुमचा फोन अनलॉक असल्यास, एखाद्याने तुम्हाला कॉल केल्यावर तुम्हाला इनकमिंग व्हॉइस कॉल पॉप-अप दिसेल, जेथे तुम्हाला नकार द्या किंवा स्वीकार करा हे पर्याय उपलब्ध असतील.
व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉल यांच्यात स्विच करणे
व्हॉइस कॉलमधून व्हिडिओ कॉलला स्विच करणे
 1. व्हॉइस कॉल चालू असताना, व्हिडिओ कॉल
  > स्विच करा वर टॅप करा.
 2. ज्या व्यक्तीसोबत तुमचा व्हॉइस कॉल सुरू आहे, त्या व्यक्तीला तो कॉल व्हिडिओ कॉलवर स्विच करण्याची विनंती दिसेल. त्यानंतर ती व्यक्ती ती स्विच विनंती स्वीकारू किंवा नाकारू शकते.
व्हिडिओ कॉलमधून व्हॉइस कॉलला स्विच करणे
 1. व्हिडिओ कॉल चालू असताना, व्हिडिओ बंद करा
  वर टॅप करा, ज्यामुळे तुमचे व्हिडिओ कॉलिंग चालू असल्याचे संपर्काला सूचित केले जाईल.
 2. दुसरी व्यक्तीदेखील त्यांचा व्हिडिओ बंद करते, तेव्हा तो कॉल आपोआपच व्हॉइस कॉलला स्विच होतो.
टीप:
 • ग्रुप व्हॉइस कॉल करत असताना किंवा तो घेताना, तुमच्याकडे आणि तुमच्या संपर्कांकडे उत्तम इंटरनेट कनेक्शन आहे याची खात्री करा. एखाद्या संपर्काकडील कनेक्शन खराब असेल, तर त्यानुसार ऑडिओ कॉलची गुणवत्तादेखील बदलेल.
 • तुम्ही WhatsApp द्वारे आपत्कालीन सेवांचे नंबर्स ‍ॲक्सेस करू शकत नाही. जसे की, भारतामध्ये तुम्ही WhatsApp वरून 100 हा नंबर वापरू शकत नाही. आपत्कालीन कॉल करायचा असल्यास तुम्ही एखादा पर्यायी मार्ग वापरणे गरजेचे आहे.
संबंधित लेख:
 • पुढील प्लॅटफॉर्म्सवर ग्रुप व्हॉइस कॉल कसा करावा: Android | iPhone
 • iPhone वर व्हॉइस कॉल कसा करावा.
हे मदतीचे होते का?
होय
नाही