संपर्क कसा जोडावा
एखादा संपर्क जोडायचा असेल, तर त्यासाठी अनेक मार्ग आहेत.
नवीन चॅट वापरून संपर्क जोडणे
- WhatsApp उघडा.
- चॅट टॅबवर जा.
- नवीन चॅट> नवीन संपर्क यावर टॅप करा.
चॅटच्या माहितीतून संपर्क जोडणे (तुम्ही चॅट केले आहे, पण सेव्ह केलेले नाहीत असे नंबर्स)
- WhatsApp उघडा.
- चॅट टॅबवर जा.
- सेव्ह न केलेल्या नंबरसोबतचे चॅट उघडा. चॅटच्या सूचीतील त्या चॅटवर नाव दिसणार नाही, नंबर दिसेल.
- चॅटची माहिती पाहण्यासाठी सर्वात वरच्या ॲप बारवर टॅप करा.
- स्क्रीनच्या सर्वात वर असलेल्या सेव्ह करा वर टॅप करा.
ग्रुप्समधून संपर्क जोडणे
- संपर्कांमध्ये समाविष्ट केलेला नाही अशा नंबरसोबतच्या मेसेजवर टॅप करा.
- अधिक वर टॅप करा.
- संपर्कांमध्ये जोडा वर टॅप करा. खालीलपैकी एक पर्याय निवडा:
- नवीन संपर्क तयार करा - नाव आणि फोन नंबर तपासून पहा.
- आधीपासून असलेल्या संपर्कामध्ये जोडा - आधीपासून सेव्ह असलेला नंबर निवडा आणि नाव व नंबर तपासून पहा.
आंतरराष्ट्रीय नंबर वापरणारे संपर्क जोडण्याकरिता, कृपया हा लेख पहा.