KaiOS वरील स्टिकर्सविषयी माहिती

KaiOS
KaiOS वरील WhatsApp द्वारे तुम्ही वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमध्ये स्टिकर्स प्राप्त करू शकता आणि पाहू शकता. सध्या KaiOS वरील WhatsApp वापरून स्टिकर्स पाठवणे शक्य नसले, तरी तुम्ही तुम्हाला प्राप्त झालेली स्टिकर्स फॉरवर्ड करू शकता.
स्टिकर्स फॉरवर्ड करणे
तुम्हाला प्राप्त झालेले स्टिकर फॉरवर्ड करण्यासाठी हे करा:
  1. तुम्हाला वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमधील जे स्टिकर फॉरवर्ड करायचे आहे ते निवडा.
  2. पर्याय> फॉरवर्ड करा यावर प्रेस करा.
  3. तुम्हाला ज्यांना स्टिकर फॉरवर्ड करायचे आहे ते संपर्क निवडा आणि पाठवा वर प्रेस करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही