आंतरराष्ट्रीय फोन नंबर समाविष्ट करणे

  1. तुमच्या फोनचे ॲड्रेस बुक उघडा.
  2. संपर्काचा फोन नंबर समाविष्ट करताना अधिक (+) चिन्हाने सुरुवात करा.
  3. त्यानंतर कंट्री कोड लिहून पुढे संपूर्ण फोन नंबर एंटर करा.
    • टीप : कंट्री कोड हा फोन नंबरच्या आधी लावायचा एक नंबर असतो. दुसऱ्या देशात कॉल करण्यासाठी त्या देशाच्या फोन नंबरच्या आधी हा कंट्री कोड लावणे गरजेचे असते. तुम्हाला हवा असणारा कंट्री कोड तुम्ही ऑनलाइन शोधू शकता.
उदाहरणार्थ, जर संपर्क अमेरिका (कंट्री कोड "1") देशातील असेल आणि त्याचा एरिया कोड "408" व फोन नंबर "XXX-XXXX" असेल, तर तुम्ही त्या संपर्काचा नंबर +1 408 XXX XXXX असा एंटर करणे अपेक्षित असते.
टीप :
  • नंबरच्या सुरुवातीला अतिरिक्त शून्ये किंवा कोणताही विशिष्ट कॉलिंग कोड लावलेला नाही याची खात्री करून घ्या.
  • तुम्हाला तुमच्या ॲड्रेस बुकमध्ये एखादा स्थानिक (देशांतर्गत) फोन नंबर समाविष्ट करायचा असेल, तर तो नंबर तुम्ही कॉल करताना लिहीता त्याच प्रकारे लिहून एंटर करा.
  • अर्जेंटिना (कंट्री कोड "54") मधील सर्व फोन नंबर्ससाठी कंट्री कोड आणि एरिया कोड यामध्ये "9" एंटर करणे गरजेचे आहे. फोन नंबर 13 अंकी व्हावा यासाठी सुरुवातीचे "15" काढून टाकणे गरजेचे आहे : +54 9 xxx xxx xxxx
  • मेक्सिको (कंट्री कोड "52") मधील फोन नंबर्ससाठी "+52" नंतर "1" लावणे गरजेचे आहे. एखादा फोन नंबर Nextel नंबर असला तरीही हे करावे लागेल.
हे मदतीचे होते का?
होय
नाही