Microsoft Edge वर नोटिफिकेशन्स न मिळणे

वेब आणि डेस्कटॉप
तुम्हाला WhatsApp वेब वर नोटिफिकेशन्स मिळत नसतील, तर तुमच्या ब्राउझरमध्ये नोटिफिकेशन्स सुरू आहेत याची खात्री करा.
नोटिफिकेशन्स सुरू करणे
  1. तुमच्या ब्राउझरमध्ये, तुमच्या चॅट्सच्या यादीच्या वर असलेल्या निळ्या बॅनरमधील डेस्कटॉप नोटिफिकेशन्स सुरू करा वर क्लिक करा.
  2. त्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या सूचनांचे पालन करत जा.
टीप : निळे बॅनर दिसत नसल्यास पेज रिफ्रेश करा. तुम्हाला अजूनही बॅनर दिसत नसेल, तर तुम्ही तुमच्या WhatsApp सेटिंग्ज मध्ये नोटिफिकेशन्स म्यूट किंवा बंद केली असल्याची शक्यता आहे.
नोटिफिकेशन्स अनब्लॉक करणे
  1. तुमच्या ब्राउझरवर अधिक आयकॉन > सेटिंग्ज > साइट परवानग्या > नोटिफिकेशन्स येथे क्लिक करा.
  2. "https://web.whatsapp.com" ब्लॉक केलेले यादीमध्ये असल्यास, त्याच्या बाजूचा अधिक आयकॉन > परवानगी द्या वर क्लिक करा.
संबंधित लेख :
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही