मेसेजेसच्या बाजूची वेळ चुकीची दिसणे

जर तुम्हाला मिळालेल्या मेसेजेस समोरील आणि 'अखेरचे पाहिलेले' समोरील टाईमस्टॅम्प चुकीचा दिसत असेल तर ते शक्यतो तुम्ही तुमच्या फोनवर चुकीचा टाईमझोन प्रविष्ट करण्याने झाले असेल. ते परत ॲडजस्ट करावे लागू शकते.
आम्ही असे सुचवितो की तुम्ही तुमचे तारीख आणि वेळ हे ऑटोमॅटिक किंवा नेटवर्कने प्रदान केलेले असू द्या. हे सेटिंग केले असल्यास तुमचा मोबाईल प्रोव्हाइडर तुमच्या फोनची वेळ योग्य वेळेवर सेट करेल. जर हे सेटिंग असूनही योग्य वेळ दिसत नसेल तर ही नेटवर्क समस्या असेल. कृपया या समस्येच्या निराकरणासाठी तुमच्या मोबाईल प्रोव्हाइडर्सशी संपर्क साधा.
तुम्हाला स्वतः मार्ग काढायचा असेल तर तुम्ही तारीख आणि वेळ सेटिंगमध्ये जाऊन स्वतः टाइम झोन सेट करा.
टीप: टाइम झोन आणि तेव्हाची खरी वेळ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही खात्री करून घ्या की तुमचे जे लोकेशन आहे त्याचा योग्य टाईमझोन निवडत आहात.
तुमचा टाईमझोन स्वतः सेट करण्यासाठी, कृपया तुमच्या फोनवर खालील गोष्टी करा:
  • Android: सेटिंग्ज > सिस्टीम > तारीख आणि वेळ येथे जा.
  • iPhone: Settings > General > Date & Time येथे जा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही