ग्रुप ॲडमीन सेटिंग्ज कशी बदलावीत

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
बाय डिफॉल्ट, ग्रुपमधील कोणताही सदस्य मेसेजेस पाठवू शकतो आणि ग्रुपचे नाव, फोटो किंवा वर्णन बदलू शकतो. तथापि, फक्त ॲडमीनला ग्रुप माहिती संपादित करण्याची किंवा मेसेजेस पाठवण्याची अनुमती द्यायची असल्यास ग्रुप ॲडमीन ग्रुप सेटिंग्ज बदलू शकतो.
ग्रुपची माहिती सेटिंग्ज बदलणे
 1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
  • किंवा, चॅट टॅबवर दिसणारा ग्रुप डाव्या बाजूला स्वाइप करा. त्यानंतर, अधिक
   > ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
 2. त्यानंतर ग्रुप सेटिंग्ज
  > ग्रुपची माहिती संपादित करा
  यावर टॅप करा.
 3. सर्व सदस्य किंवा केवळ ॲडमीन यापैकी कोणाला ग्रुपची माहिती बदलण्याची परवानगी द्यायची ते निवडा.
ग्रुपची मेसेज सेटिंग्ज बदलणे
 1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
  • किंवा, चॅट टॅबवर दिसणारा ग्रुप डाव्या बाजूला स्वाइप करा. त्यानंतर, अधिक
   > ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
 2. ग्रुप सेटिंग्ज
  > मेसेजेस पाठवा
  वर टॅप करा.
 3. सर्व सदस्य किंवा केवळ ॲडमीन्स यापैकी कोणाला मेसेजेस पाठवण्याची परवानगी द्यायची ते निवडा.
ॲडमीनशी थेट संपर्क साधण्यासाठी सदस्य 'ॲडमीन' वर टॅप करून ज्या ॲडमीनला मेसेज पाठवायचा आहे, त्याच्या नावावर टॅप करू शकतात.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही