ग्रुप ॲडमीन सेटिंग्ज कशी बदलावीत

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
बाय डिफॉल्ट, ग्रुपमधील कोणताही सदस्य मेसेजेस पाठवू शकतो आणि ग्रुपचे नाव, फोटो किंवा वर्णन बदलू शकतो. तथापि, फक्त ॲडमीनला ग्रुप माहिती संपादित करण्याची किंवा मेसेजेस पाठवण्याची अनुमती द्यायची असल्यास ग्रुप ॲडमीन ग्रुप सेटिंग्ज बदलू शकतो.
ग्रुपची माहिती सेटिंग्ज बदलणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट सुरू करा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
    • किंवा सर्वात वर कोपऱ्यात असलेल्या मेनूवर (
      किंवा
      ) > ग्रुपची माहिती वर क्लिक करा.
  2. ग्रुप सेटिंग्ज > ग्रुपची माहिती संपादित करा वर क्लिक करा.
  3. सर्व सदस्य किंवा केवळ ॲडमीन्स यापैकी कोणाला ग्रुपची माहिती बदलण्याची परवानगी द्यायची ते निवडा.
  4. ठीक आहे वर क्लिक करा.
ग्रुपची मेसेज सेटिंग्ज बदलणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट सुरू करा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
    • किंवा सर्वात वर कोपऱ्यात असलेल्या मेनूवर (
      किंवा
      ) > ग्रुपची माहिती वर क्लिक करा.
  2. ग्रुप सेटिंग्ज > मेसेजेस पाठवा वर क्लिक करा.
  3. सर्व सदस्य किंवा केवळ ॲडमीन्स यापैकी कोणाला मेसेजेस पाठवण्याची परवानगी द्यायची ते निवडा.
  4. ठीक आहे वर क्लिक करा.
ॲडमीनशी थेट संपर्क साधण्यासाठी सदस्य 'ॲडमीन' वर टॅप करून ज्या ॲडमीनला मेसेज पाठवायचा आहे, त्याच्या नावावर टॅप करू शकतात.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही