तुमच्या खाते माहितीची विनंती कशी करावी

iPhone
Android
KaiOS
'खाते माहितीची विनंती करा' हे फीचर तुम्हाला तुमच्या WhatsApp खाते माहितीची व सेटिंग्जची विनंती करण्याची आणि त्याचा रिपोर्ट एक्स्पोर्ट करण्याची अनुमती देते. या रिपोर्टमध्ये तुमचे मेसेजेस समाविष्ट नसतील. तुम्हाला ॲपमधील मेसेजेसव्यतिरिक्त इतर मेसेजेस ॲक्सेस करायचे असल्यास, तुम्ही त्याऐवजी तुमचे पूर्वीचे चॅट एक्स्पोर्ट करू शकता.
कृपया लक्षात घ्या, की हे फीचर Windows साठी WhatsApp वर उपलब्ध नाही.
रिपोर्टची विनंती करणे
  1. WhatsApp सेटिंग्ज > खाते > खाते माहितीची विनंती करा यावर जा.
  2. रिपोर्टची विनंती करा वर टॅप करा. स्क्रीनची स्थिती बदलून विनंती केली वर सेट होईल.
विनंती केल्याच्या तारखेपासून सुमारे तीन दिवसांनी तुमचा रिपोर्ट उपलब्ध होईल. तुमच्या रिपोर्टची प्रतीक्षा करत असताना तुम्ही तयार होण्याची तारीख पाहू शकता.
टीप:
  • तुम्ही रिपोर्टची विनंती केली की ती मागे घेता येत नाही किंवा रद्द करता येत नाही.
  • तुम्ही तुमचा फोन नंबर बदललात किंवा तुमचे खाते हटवले, तर तुमची प्रलंबित विनंती आपोआपच रद्द होईल आणि तुम्हाला रिपोर्ट हवा असल्यास नव्याने विनंती करावी लागेल.
रिपोर्ट डाउनलोड करणे आणि एक्स्पोर्ट करणे
रिपोर्ट डाउनलोडसाठी उपलब्ध होईल, तेव्हा तुम्हाला तसे कळवणारे WhatsApp नोटिफिकेशन मिळेल आणि त्यामध्ये हे लिहिलेले असेल: “तुमचा खाते रिपोर्ट आता उपलब्ध आहे”. रिपोर्ट उपलब्ध झाल्याच्या दिवसापासून तो आमच्या सर्व्हर्सवरून हटवला जाईपर्यंत किती आठवडे उपलब्ध असेल हे WhatsApp मधील खाते माहितीची विनंती करा या स्क्रीनवर दिसेल. या रिपोर्टमध्ये‍ तुमची वैयक्तिक माहिती असते, त्यामुळे हा रिपोर्ट इतर कोणत्याही सेवांवर स्टोअर करताना, पाठवताना किंवा अपलोड करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.
  1. WhatsApp सेटिंग्ज > खाते > खाते माहितीची विनंती करा यावर जा.
  2. रिपोर्ट डाउनलोड करा वर टॅप करा. तुमच्या फोनवर एक ZIP फाइल डाउनलोड होईल. त्या फाइलमध्ये HTML आणि JSON फाइल्स असतील.
  3. फाइल डाउनलोड केल्यानंतर, रिपोर्ट एक्स्पोर्ट करा > एक्स्पोर्ट करा किंवा रिपोर्ट एक्स्पोर्ट करा वर टॅप करा. डाउनलोड केलेला रिपोर्ट तुम्हाला WhatsApp मध्ये पाहता येणार नाही.
  4. तुम्हाला ज्या ॲपवर हा रिपोर्ट एक्स्पोर्ट करायचा असेल ते ॲप शेअर ट्रेमधून निवडा. उदाहरणार्थ, तुम्ही रिपोर्टची एक प्रत स्वत:ला ईमेल करू शकता.
तुम्ही तुमच्या फोनवर रिपोर्ट डाउनलोड केल्यानंतर, तुमच्याकडे खाते माहितीची विनंती करा स्क्रीनवर रिपोर्ट हटवा > हटवा किंवा रिपोर्ट हटवा वर टॅप करून डाउनलोड केलेली प्रत कायमची हटवण्याचा पर्याय असेल. रिपोर्ट हटवल्याने तुमच्या WhatsApp खात्यामधील कोणताही डेटा हटवला जाणार नाही.
संबंधित लेख:
  • KaiOS वर तुमच्या खाते माहितीची विनंती कशी करावी
  • पुढील प्लॅटफॉर्म्सवर पूर्वीचे चॅट कसे एक्स्पोर्ट करावे: Android | iPhone
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही