संपर्क न दिसणे

Android
iOS
तुमच्या संपर्कांच्या नावांऐवजी नंबर्स दिसत असल्यास किंवा काही संपर्क दिसत नाही आहेत असे आढळल्यास, तुम्ही काही गोष्टी तपासणे आवश्यक आहे:
तुमचे संपर्क शोधणे
 1. चॅट्स टॅबवर जा आणि खाली स्क्रोल करा.
  • किंवा, कॉल्स टॅबवर जा आणि + वर टॅप करा
 2. शोध बारमध्ये संपर्काचे नाव किंवा फोन नंबर टाइप करा.
तुमचे संपर्क रीसेट करणे
WhatsApp आणि तुमच्या फोनचे संपर्क यांमधील सिंक रीसेट करण्यासाठी:
 1. iPhone सेटिंग्ज > गोपनीयता आणि सुरक्षा यावर जा.
 2. संपर्क वर टॅप करा.
 3. WhatsApp सुरू केले असल्याची खात्री करा.
WhatsApp करड्या रंगात दिसत असल्यास, तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये कोणत्याही मर्यादा सेट केलेल्या नाहीत याची खात्री करा. तुमच्या iPhone च्या सेटिंग्ज > स्क्रीन वेळ > संपर्क आणि गोपनीयता प्रतिबंध > गोपनीयता यावर जा आणि WhatsApp टॉगल सुरू असल्याची याची खात्री करा.
WhatsApp तरीही करड्या रंगात दिसत असल्यास, तुम्हाला कदाचित तुमचा फोन रिस्टोअर करावा लागेल. तुमच्या माहितीचा बॅकअप कसा घ्यावा आणि ती रिस्टोअर कशी करावी याबद्दल जाणून घेण्यासाठी Apple सपोर्ट वेबसाइटला भेट द्या.
तुम्ही WhatsApp ला तुमच्या फोनमधील संपर्क वापरण्याची परवानगी दिलेली नसेल, तरी तुम्ही हे करू शकता:
 • इतर WhatsApp वापरकर्ते आणि ग्रुप्सचे मेसेज मिळवू शकता.
 • WhatsApp सेटिंग्ज बदलू शकता.
तुम्ही हे करू शकणार नाही:
 • तुम्हाला संपर्काचे नाव दिसणार नाही, फक्त त्यांचा फोन नंबर दिसेल.
 • नवीन ग्रुप्स किंवा ब्रॉडकास्ट लिस्ट्स सुरू करता येणार नाहीत.
दिसत नसलेले आंतरराष्ट्रीय किंवा एक्स्चेंज संपर्क
तुम्हाला तरीही तुमचे काही संपर्क WhatsApp वर दिसत नसतील, तर पुढील गोष्टी करून पहा:
 • आंतरराष्ट्रीय संपर्कांसाठी तुम्ही योग्य फोन नंबर संपूर्ण आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये जोडला असल्याची खात्री करा.
 • तुम्हाला दिसत नसलेले संपर्क हे Exchange खात्यामध्ये स्टोअर केलेले असतील, तर खाते ॲडमिनिस्ट्रेटर WhatsApp किंवा इतर ॲप्सना तुमचे संपर्क वापरण्याची परवानगी देत नाही आहे असे असू शकते. तुमचे एक्स्चेंज संपर्क तुमच्या फोनच्या अ‍ॅड्रेस बुकमध्ये किंवा iCloud वर कॉपी करण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या आयटी व्यवस्थापकाला तुमच्या iPhone मध्ये WhatsApp ला व्यवस्थापित ॲप बनवण्यास सांगा.
टीप: एक्स्चेंज खाती ही कामासंबंधित खाती असण्याची शक्यता आहे.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही