ग्रुपमध्ये एखाद्याला 'मेन्शन' अर्थात नमूद कसे करावे
तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या ग्रुपमध्ये असल्यास, तुम्ही मेसेजमध्ये “@” चिन्ह टाइप करून आणि संपर्काचे नाव निवडून त्यांना नमूद करू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्याला 'मेन्शन' अर्थात नमूद करता, तेव्हा त्यांना त्यांच्या चॅट लिस्टमध्ये न वाचलेल्या मेसेजपुढे “@” चिन्हाचे नोटिफिकेशन दिसेल.
टीप:
- ग्रुपमधील एखाद्या संपर्कास नमूद केल्यास आणि त्या संपर्काने तुमचे खाजगी चॅट म्यूट केलेले नसल्यास, त्या संपर्काने ग्रुपसाठी सेट केलेली कोणतीही म्यूट नोटिफिकेशन्स ओव्हरराइड केली जातील.
- तुम्ही उल्लेख करत असलेल्या संपर्काचे नाव ग्रुपमधील इतर सदस्यांसाठी वेगळ्या प्रकारे, म्हणजेच त्यांच्या अॅड्रेस बुकमध्ये संपर्क जसा सेव्ह केला आहे तसे दाखवले जाऊ शकते.
तुम्हाला ग्रुपमध्ये नमूद केले असल्यास
जर तुम्हाला कोणी @ नमूद केले असेल किंवा तुमच्या मेसेजला रिप्लाय केले असेल, तर तुमच्या चॅट लिस्टमध्ये न वाचलेल्या मेसेजपुढे तुम्हाला “@” चिन्हाचे नोटिफिकेशन दिसेल. तुम्ही त्या चॅटवर टॅप केल्यास, तुम्हाला नमूद केलेले किंवा रिप्लाय दिलेले मेसेजेस ग्रुपच्या तळाशी कोपऱ्यात दिसणाऱ्या “@” बटणावर टॅप करून त्वरित पाहू शकता.