ग्रुपमध्ये एखाद्याला 'मेन्शन' अर्थात नमूद कसे करावे
लिंक कॉपी करा
Android
iOS
Web
Windows
Mac
Android
iOS
Web
Windows
Mac
तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या ग्रुपमध्ये असल्यास, तुम्ही मेसेजमध्ये @ टाइप करून आणि त्यांचे नाव निवडून त्यांचा उल्लेख करू शकता. त्यांना त्यांच्या चॅट लिस्टमध्ये न वाचलेल्या मेसेजच्या शेजारी @ दिसेल आणि त्यांचा उल्लेख केलेले किंवा त्यांना प्रत्युत्तर दिलेले मेसेजेस ते लगेच मिळवू शकतील.
ग्रुपमधील एखाद्याचा उल्लेख करणे
- ग्रुप चॅटमध्ये, मेसेज फील्डमध्ये @ टाइप करा.
- यादीमधून सदस्याचे नाव निवडा.
- तुमचा मेसेज टाइप करा, त्यानंतर वर क्लिक करा.
ग्रुपमध्ये तुमचा उल्लेख केला असल्यास
तुमचा उल्लेख झाला असल्यास किंवा कोणीतरी तुमच्या मेसेजला प्रत्युत्तर दिले असल्यास, तुम्हाला तुमच्या चॅट लिस्टमध्ये न वाचलेल्या मेसेजच्या शेजारी @ असे चिन्ह असलेले नोटिफिकेशन दिसेल.
तुम्ही चॅट उघडता तेव्हा तुमचा उल्लेख केलेले किंवा प्रत्युत्तर दिलेले मेसेजेस तुम्ही पाहू शकता.
टीप:
- ग्रुपमधील एखाद्या संपर्कास नमूद केल्यास आणि त्या सदस्याने तुमचे खाजगी चॅट म्यूट केलेले नसल्यास, त्या संपर्काने ग्रुपसाठी सेट केलेली कोणतीही म्यूट नोटिफिकेशन्स ओव्हरराइड केली जातील.
- तुम्ही उल्लेख करत असलेल्या सदस्याचे नाव ग्रुपमधील इतर सदस्यांसाठी वेगळ्या प्रकारे, म्हणजेच त्यांच्या अॅड्रेस बुकमध्ये त्यांचे नाव जसे सेव्ह केले आहे तसे दाखवले जाऊ शकते.