कॉल वेटिंग कसे वापरायचे

Android
iPhone
जर तुमचा WhatsApp व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल चालू असताना दुसरा एखादा व्हिडिओ WhatsApp व्हॉइस किंवा कॉल येत असेल तर कोणता कॉल आहे त्यानुसार तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही तो कॉल स्वीकारायचा की नाकारायचा हे निवडू शकता. यामुळे तुमच्या चालू कॉल मध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
जर WhatsApp वरून तुम्हाला कोणी कॉल करत असेल तर
तुम्ही खालील निवड करू शकता :
  • समाप्त करा आणि स्वीकारा : तुम्ही सध्या ज्या कॉल वर आहात तो बंद करा आणि आलेला नवीन कॉल स्वीकारा.
  • नाकारा : येणाऱ्या नवीन कॉलला नकार द्या आणि सध्याचा कॉल चालू ठेवा.
जर तुम्हाला WhatsApp ऐवजी इतर माध्यमांद्वारे कॉल येत असेल तर
तुम्ही WhatsApp व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल वर असताना जर तुम्हाला लँडलाईन किंवा मोबाईल फोन वरून कॉल येत असेल तर तुम्ही पुढील पैकी एकावर टॅप करू शकता :
  • उत्तर द्या : तुम्ही सध्या ज्या कॉल वर आहात तो बंद करा आणि आलेला नवीन कॉल स्वीकारा.
  • नाकारा : येणाऱ्या नवीन कॉलला नकार द्या आणि सध्याचा कॉल चालू ठेवा.
  • स्क्रीन कॉल: तुमच्या कॉलसाठी Google Assistant वापरा आणि कोण आणि का कॉल करत आहे ते विचारा.
टीप :
  • WhatsApp व्यतिरिक्त इतर माध्यमांद्वारे आलेल्या कॉल्सचे शुल्क तुमच्या मोबाईल कॅरिअर वर अवलंबून आहे. तुम्ही जर रोमिंग डेटा वापरत असाल किंवा तुमचे डेटा लिमिट संपले असेल तर तुम्हाला WhatsApp व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल साठी शुल्क पडू शकते.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही