iCloud बॅकअप तयार किंवा रिस्टोअर करता न येणे

iPhone
तुम्हाला iCloud वर बॅकअप तयार करण्यात किंवा तो रिस्टोअर करण्यात समस्या येत असेल, तर त्या समस्येच्या निराकरणासाठी खालील पायऱ्या वापरून पहा.
बॅकअप तयार करता न येणे
iCloud वर बॅकअप तयार करता येत नसल्यास, कृपया खालील गोष्टी करा:
 • iCloud वापरण्यासाठी तुम्ही जो Apple ID वापरता, तोच आयडी वापरून साइन इन केलेले आहे याची खात्री करून घ्या.
 • iCloud Drive सुरू असल्याची पडताळणी करा. iPhone च्या Settings वर जा > तुमच्या नावावर टॅप करा > iCloud > iCloud Drive सुरू आहे का हे तपासा.
 • iCloud Drive बंद करा आणि पुन्हा सुरू करा. iPhone च्या Settings वर जा > तुमच्या नावावर टॅप करा > iCloud वर जाऊन iCloud Drive बंद करा आणि पुन्हा सुरू करा.
 • तुम्ही तुमचा Apple ID वापरून कोणत्याही डिव्हाइसवर iCloud Drive सुरू केलेले असल्यास, बॅकअप तयार करण्यासाठी ते डिव्हाइस iOS 12 किंवा त्यापुढील आवृत्तीवर अपडेट करा.
 • तुमच्या iCloud खात्यामध्ये बॅकअपसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे याची खात्री करून घ्या. तुमच्या iCloud खात्यामध्ये तुमच्या बॅकअपसाठी लागणाऱ्या जागेपेक्षा २.०५ पट अधिक जागा असणे आवश्यक आहे.
 • तुम्ही मोबाइल डेटा वापरून बॅकअप घेण्याचा प्रयत्न करत असल्यास, iCloud साठी मोबाइल डेटा वापर सुरू करा.
 • WhatsApp उघडा, सेटिंग्ज > चॅट > चॅट बॅकअप > आताच बॅकअप घ्या यावर जा आणि मॅन्युअल बॅकअप घ्या.
 • एखाद्या वेगळ्या नेटवर्कवर बॅकअप घेऊन पहा. शक्यतो तुम्ही नेहमी जे नेटवर्क वापरता, तेच वापरा.
बॅकअप रिस्टोअर करता न येणे
iCloud बॅकअप रिस्टोअर करता येत नसल्यास, कृपया खालील गोष्टी करा:
 • तुम्ही ज्या फोन नंबरवर आणि iCloud खात्यावर बॅकअप घेतला होता, तोच नंबर आणि खाते वापरून बॅकअप रिस्टोअर करत आहात याची खात्री करून घ्या.
 • तुम्ही एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित बॅकअप रिस्टोअर करत असल्यास, तुम्ही योग्य पासवर्ड किंवा की वापरत आहात याची खात्री करून घ्या.
 • बॅकअप रिस्टोअर करण्यासाठी तुमच्या iPhone वर पुरेशी जागा उपलब्ध आहे याची खात्री करून घ्या. तुमच्या फोनमध्ये आणि तुमच्या iCloud खात्यामध्ये तुमच्या बॅकअपसाठी लागणाऱ्या जागेपेक्षा २.०५ पट अधिक जागा असणे आवश्यक आहे.
 • iCloud Drive वापरून बॅकअप घेतलेला असल्यास, फक्त iOS 12 किंवा त्यानंतरची आवृत्ती असलेल्या iPhone वरच बॅकअप रिस्टोअर करता येईल.
 • तुम्ही तुमचा Apple ID वापरून कोणत्याही डिव्हाइसवर iCloud Drive सुरू केलेले असल्यास, बॅकअप तयार करण्यासाठी त्या डिव्हाइसमध्ये iOS 12 किंवा त्यापुढील आवृत्ती असणे आवश्यक आहे. असे नसल्यास, बॅकअप रिस्टोअर करता येणार नाही.
 • एखाद्या वेगळ्या नेटवर्कवरून बॅकअप रिस्टोअर करून पहा. शक्यतो तुम्ही नेहमी जे नेटवर्क वापरता, तेच वापरा.
 • iCloud Drive बंद करा आणि पुन्हा सुरू करा. iPhone च्या Settings वर जा > तुमच्या नावावर टॅप करा > iCloud वर जाऊन iCloud Drive बंद करा आणि पुन्हा सुरू करा.
 • iCloud मधून साइन आउट करा आणि तुमचा iPhone बंद करून पुन्हा सुरू करा. त्यानंतर, iCloud मध्ये पुन्हा साइन इन करून पुन्हा एकदा बॅकअप रिस्टोअर करण्याचा प्रयत्न करा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही