ग्रुपमध्ये 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू किंवा बंद कसे करावे

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू करून तुम्ही WhatsApp वर नाहीसे होणारे मेसेजेस पाठवू शकता. या फीचरअंतर्गत तुम्ही मेसेजेस २४ तासांनी, ७ दिवसांनी किंवा ९० दिवसांनी नाहीसे होण्याचा पर्याय निवडू शकता. तुम्ही एकाहून अधिक विद्यमान चॅट्ससाठी एक्स्पायर होणारे मेसेजेस हे फीचर सुरू करू शकता. हे फीचर सुरू केल्याने चॅटमध्ये पाठवलेले नवीन मेसेज तुम्ही निवडलेल्या कालावधीनंतर नाहीसे होतील. याचा 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू करण्यापूर्वी पाठवलेल्या किंवा प्राप्त झालेल्या मेसेजेसवर परिणाम होणार नाही.
'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू करणे
ग्रुप चॅट असल्यास ग्रुपचा कोणताही सदस्य 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू किंवा बंद करू शकतो. तथापि, फक्त ॲडमिन्सना 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू करायची अनुमती द्यायची असल्यास ग्रुप ॲडमिन तशा पद्धतीने ग्रुप सेटिंग्ज बदलू शकतो. ग्रुप ॲडमिन सेटिंग्ज कशी बदलावी हे जाणून घेण्यासाठी, हा लेख पहा.
  1. WhatsApp ग्रुप चॅट उघडा.
  2. ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
  3. एक्स्पायर होणारे मेसेजेस वर क्लिक करा.
    • सूचना दिसल्यास, पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
  4. २४ तास, ७ दिवस किंवा ९० दिवस निवडा.
  5. तुम्हाला कोणती चॅट्स सुरू करायची आहेत ते निवडा.
  6. वर टॅप करा
तुम्ही नवीन ग्रुप चॅट तयार करत असतानादेखील 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू करू शकता.
'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर बंद करणे
ग्रुप ॲडमिनने 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर बंद करण्याचे अधिकार फक्त ॲडमिन्सपुरता मर्यादित न ठेवल्यास, ग्रुप चॅटमधील कोणताही सदस्य हे फीचर कधीही बंद करू शकतो.
  1. WhatsApp ग्रुप चॅट उघडा.
  2. ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
  3. एक्स्पायर होणारे मेसेजेस वर क्लिक करा.
    • सूचना दिसल्यास, पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
  4. बंद करा निवडा.
  5. तुम्हाला कोणती चॅट्स बंद करायची आहेत ते निवडा.
  6. वर टॅप करा
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही