मेसेजेस पाठवू किंवा प्राप्त करू शकत नाही

काहीवेळा मेसेजेस पाठवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. मेसेजवर 'एकच बरोबरची खूण' आहे असे खूप वेळा घडते.
मेसेज पोहोचण्यास किंवा फक्त 'एकच बरोबरची खूण' दिसायला लागण्यास थोडा वेळ लागू शकतो आणि त्यामागे अनेक कारणे आहेत:
 • तुम्हाला किंवा तुमच्या संपर्काला कनेक्शनशी संबंधित समस्या येत आहेत.
 • दुसऱ्या व्यक्तीचा फोन बंद असू शकतो.
 • ते कव्हरेज क्षेत्राबाहेर किंवा रोमिंगच्या बाहेर असू शकतात.
 • त्यांच्या फोनमधील डेटा संपलेला असू शकतो.
 • त्यांनी कदाचित नोटिफिकेशन पाहिले असेल, परंतु त्यांनी WhatsApp लॉंच केले नाही.
 • त्यांची नोटिफिकेशन्स यायला वेळ लागत असू शकतो किंवा ती बंद केलेली असू शकतात.
 • त्यांनी कदाचित तुम्हाला ब्लॉक केले असेल.
या गोष्टी करून पहा
तुमचे डिव्हाइस मेसेजेस पाठवू किंवा प्राप्त करू शकत नसल्यास, प्रयत्न करण्यासाठी येथे काही पायऱ्या आहेत:
 • WhatsApp च्या नवीनतम आवृत्तीवर अपडेट करा.
 • तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करण्याचा प्रयत्न करा.
 • तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट केले असल्याची खात्री करा.
 • तुमचे डिव्हाइस पुन्हा सुरू करा.
 • तुम्ही तुमच्या फोन नंबरसाठी पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची खात्री करा.
 • तुम्ही तुमच्या संपर्काचा फोन नंबर तुमच्या डिव्हाइसमध्ये संपूर्ण आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये सेव्ह केला असल्याची खात्री करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही