चॅट हटविणे

एखादे वैयक्तिक चॅट हटवणे
 1. चॅट टॅब मध्ये, तुम्हाला जे चॅट हटवायचे आहे त्यावर टॅप करून धरून ठेवा.
 2. हटवा
  > हटवा वर टॅप करा.
ग्रुप चॅट हटवणे
ग्रुप चॅट हटवण्यासाठी, तुम्ही सर्वप्रथम ग्रुपमधून बाहेर येणे आवश्यक आहे.
 1. चॅट टॅबमध्ये, तुम्हाला जे चॅट हटवायचे आहेत त्यावर टॅप करून धरून ठेवा.
 2. अधिक पर्याय
  > ग्रुपमधून बाहेर पडा > बाहेर पडा वर टॅप करा.
 3. ग्रुप चॅटवर टॅप करून धरून ठेवा आणि हटवा
  > हटवा वर टॅप करा.
सर्व चॅट एकाचवेळी हटवणे
 1. चॅट टॅब मध्ये अधिक पर्याय
  > सेटिंग्ज > चॅट > पूर्वीचे चॅट वर टॅप करा.
 2. सर्व चॅट हटवा वर टॅप करा.
वैयक्तिक चॅट आणि तुमचे स्टेटस अपडेट तुमच्या चॅट टॅब मधून हटविले जातील. ग्रुप चॅट मात्र अजूनही तुमच्या चॅट टॅब मध्ये दिसतील आणि तुम्ही त्यातून बाहेर पडेपर्यंत त्याचा एक भाग असाल.
संबंधित लेख :
हे मदतीचे होते का?
होय
नाही