संपर्क न दिसणे

संपर्कांबाबतच्या सर्वोत्तम अनुभवासाठी तुम्ही WhatsApp ला तुमचे संपर्क वापरण्याची परवानगी द्यावी असे आम्ही सुचवतो.
तुमच्या संपर्कांचा ॲक्सेस सुरू करणे
  1. iPhone मधील Settings
    > Privacy वर जा.
  2. Contacts वर टॅप करा.
  3. WhatsApp ‘सुरू आहे’ वर सेट आहे याची खात्री करून घ्या.
सेटिंग्ज‍मध्ये दिसत नसल्यास, तुम्ही
iPhone Settings > Screen Time > Content & Privacy Restrictions मध्ये कोणतेही प्रतिबंध सेट केले नसल्याची खात्री करा. यापैकी कोणतेही कारण नसल्यास, तुम्हाला तुमचा फोन रिस्टोअर करून पाहावा लागेल. तुमच्या माहितीचा बॅकअप कसा घ्यावा आणि ती रिस्टोअर कशी करावी याबद्दल जाणून घेण्यासाठी Apple सपोर्ट वेबसाइटला भेट द्या.
तुम्ही WhatsApp ला तुमच्या फोनमधील संपर्क वापरण्याची परवानगी दिलेली नसेल, तरीही तुम्ही हे करू शकता :
  • इतर WhatsApp वापरकर्ते आणि ग्रुप्सचे मेसेज मिळवू शकता.
  • WhatsApp सेटिंग्ज बदलू शकता.
तुम्ही हे करू शकणार नाही:
  • तुम्हाला संपर्काचे नाव दिसणार नाही, फक्त त्याचा फोन नंबरच दिसेल.
  • नवीन ग्रुप्स किंवा ब्रॉडकास्ट लि्स्ट सुरू करता येणार नाही.
काही संपर्क न दिसणे
तुम्हाला तुमचे काही WhatsApp संपर्क दिसत नसतील, तर पुढील गोष्टी करून पहा:
आंतरराष्ट्रीय संपर्कांसाठी :
तुम्हाला दिसत नसलेले संपर्क हे Exchange खात्यामध्ये स्टोअर केलेले असतील, तर खाते ॲडमिनिस्ट्रेटर WhatsApp किंवा इतर ॲप्सना तुमचे संपर्क वापरण्याची परवानगी देत नाही आहे असे असू शकते. तुम्ही ही समस्या खालील प्रकारे सोडवू शकता:
  • तुमचे Exchange संपर्क तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये किंवा iCloud वर कॉपी करा.
  • तुमच्या आयटी ॲडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधून WhatsApp ला iPhone मधील एक व्यवस्थापित ॲप करून घ्या.
टीप:
  • Exchange खाती ही शक्यतो कामाशी निगडीत खाती असतात.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही