संपर्क कसा हटवावा

Android
iOS
WhatsApp तुमच्या फोनचे ॲड्रेस बुक ॲक्सेस करून तुमचे कोणते संपर्क WhatsApp वापरत आहेत हे ओळखते. तुम्ही एखाद्या संपर्काला तुमच्या फोनच्या अ‍ॅड्रेस बुकमधून हटवू शकता, पण तुम्ही त्या संपर्काला WhatsApp मधून हटवू शकत नाही.
तुमच्या अ‍ॅड्रेस बुकमधून संपर्काला हटवण्यासाठी:
  1. WhatsApp उघडा आणि चॅट्स टॅबवर जा.
  2. नवीन चॅट
    new chat
    वर टॅप करा > तुम्ही हटवू इच्छिता तो संपर्क शोधा किंवा निवडा.
  3. सर्वात वर दिसणाऱ्या संपर्क नावावर टॅप करा.
  4. संपादित करा वर टॅप करा > तळाशी स्क्रोल करा आणि संपर्क हटवा वर टॅप करा.
तुमच्या फोनच्या अ‍ॅड्रेस बुकमधून संपर्क हटवल्याने त्या संपर्कासोबतचे पूर्वीचे चॅट हटवले जाणार नाही. चॅट कसे हटवावे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा लेख पाहू शकता.

तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?

होय
नाही