ग्रुपमधून बाहेर पडणे आणि ग्रुप हटविणे

Android
iOS
KaiOS
Web
Windows
Mac
तुम्ही ग्रुप ॲडमिन असाल, तर तुम्ही सर्व सदस्यांसाठी ग्रुपला हटवू शकता. ग्रुप हटवण्यापूर्वी तुम्ही आधी ग्रुपमधील सर्व सदस्यांना काढून नंतर ग्रुपमधून बाहेर पडणे आवश्यक आहे.

तुम्‍ही ग्रुप सदस्‍यांना काढून टाकल्‍यावर किंवा ग्रुप हटवल्‍यावर काय होते

तुम्‍ही ग्रुप हटवल्‍यावर, तुम्‍हाला तुमच्‍या चॅट्स सूचीमध्ये ग्रुप दिसणार नाही. ग्रुपवरील पूर्वीचे चॅटदेखील तुमच्या फोनवरून मिटवले जाईल.
सदस्‍याला काढून टाकल्‍याने किंवा ग्रुप हटवल्‍याने इतर सदस्‍यांच्‍या डिव्‍हाइसेसवरून ग्रुप हटवला जाणार नाही. इतर सदस्‍यांना त्‍यांच्‍या चॅट्स सूचीमध्ये त्यानंतरही ग्रुप दिसेल आणि ते स्वतःहून मागील सर्व आशय हटवत नाहीत, तोपर्यंत त्यांना तो आशय दिसेल. इतर कुणीही मेसेजेस पाठवू शकणार नाही.
ग्रुप हटवल्यानंतर तो रिस्टोअर करणे शक्य नाही.

ग्रुपच्या सदस्यांना काढणे

तुम्‍ही ग्रुपमधून बाहेर पडण्‍यापूर्वी आणि तो हटवण्‍यापूर्वी, तुम्‍हाला सर्व ग्रुप सदस्‍यांना काढावे लागेल.
  1. WhatsApp ग्रुप चॅट उघडा, त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
  2. सदस्याच्या नावाशेजारील
    menu
    > काढा > काढा यावर क्लिक करा.

ग्रुपमधून बाहेर पडणे

ग्रुप हटवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ग्रुपमधून बाहेर पडणे गरजेचे आहे.
  1. WhatsApp ग्रुप चॅट उघडा, त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
    • किंवा, तुमच्या चॅट्सच्या सूचीमधील ग्रुपवर कर्सर न्या, त्यानंतर
      menu
      वर क्लिक करा.
  2. exit or delete group
    > बाहेर पडा यावर क्लिक करा.
तुम्ही ग्रुपमधून बाहेर पडता, तेव्हा फक्त ग्रुपच्या ॲडमिन्सना सूचित केले जाईल.
तुमचे प्रोफाइल नाव आणि फोन नंबर ही माहिती ग्रुपच्या माहितीमध्ये असलेल्या यापूर्वीच्या सदस्यांच्या सूचीमध्ये दाखवली जाईल. तुमच्या सेटिंग्जनुसार तुमचा प्रोफाइल फोटोदेखील दाखवला जाऊ शकतो.
तुम्ही ग्रुपमधून बाहेर पडल्यानंतर ग्रुपमधील सदस्यांना या सूचीमध्ये कमाल ६० दिवस तुमची माहिती दिसू शकते.
टीप:
  • कम्युनिटीचा भाग असलेल्या ग्रुपमधून बाहेर पडल्यावर, तुम्ही कम्युनिटीतूनही बाहेर पडाल. तुम्ही कम्युनिटीतून बाहेर पडलात, तर तुम्ही कम्युनिटीतील ग्रुप्समधूनही बाहेर पडाल.
  • तुम्ही एखाद्या ग्रुपचे एकमेव ग्रुप ॲडमिन असल्यास आणि तुम्ही त्या ग्रुपमधून बाहेर पडल्यास, नवीन ग्रुप ॲडमिन बनवण्यासाठी दुसऱ्या एखाद्या सदस्याची रँडम पद्धतीने निवड केली जाते. तुम्ही ग्रुपमध्ये पुन्हा सामील झाल्यास आणि तुम्हाला पुन्हा ॲडमिन होण्याची इच्छा असल्यास, तुम्ही ग्रुप ॲडमिनला तुम्हाला अ‍ॅडमिन बनवण्यास सांगणे आवश्यक आहे.

ग्रुप हटवणे

तुम्‍ही सर्व सदस्‍यांना काढल्‍यानंतर आणि ग्रुपमधून बाहेर पडल्‍यानंतर, तुमच्‍याकडे ग्रुप हटवण्‍याचा पर्याय असतो.
  1. WhatsApp ग्रुप चॅट उघडा, त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
    • किंवा, तुमच्या चॅट्सच्या सूचीमधील ग्रुपवर कर्सर न्या, त्यानंतर
      menu
      वर क्लिक करा.
  2. ग्रुप हटवा > हटवा यावर क्लिक करा.

कम्युनिटीचा भाग असलेला ग्रुप हटवा

कम्‍युनिटीचा भाग असलेले ग्रुप्‍स तुमच्‍या चॅट्स सूचीमध्ये नाहीत.
कम्युनिटी शोधण्याचे काही मार्ग खालीलप्रमाणे:
  • कम्‍युनिटीज टॅबमध्‍ये.
  • तुमच्या चॅट्स टॅबमध्‍ये.
  • शोध बारमध्ये ग्रुपचे नाव टाइप करून.
ग्रुप हटवण्याकरिता वरील पायऱ्या वापरा. तुम्‍ही कम्‍युनिटीमधून ग्रुपदेखील हटवू शकता. कसे ते जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.

तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?

होय
नाही