तुमचा फोन नंबर कसा बदलावा

Android
iPhone

'नंबर बदला' या फीचरमुळे तुम्हाला त्याच फोनवर किंवा नव्या फोनवर WhatsApp शी लिंक असलेला फोन नंबर बदलण्यात मदत होते. तुमचा फोन नंबर बदलण्याआधी हे करा:
  • तुमच्या नवीन फोन नंबरवर SMS किंवा कॉल येत असल्याची आणि त्यामध्ये उत्तम मोबाइल इंटरनेट असल्याची खात्री करा.
  • तुमच्या जुन्या फोन नंबरची WhatsApp वर नोंदणी झालेली आहे याची खात्री करा. तुम्ही WhatsApp उघडून, त्यानंतर अधिक पर्याय > सेटिंग्ज > तुमचा प्रोफाइल फोटो यावर टॅप करून तुमचा नोंदणी केलेला फोन नंबर पाहू शकता.
  • तुम्ही सपोर्ट असलेला फोन नंबर वापरत आहात याची खात्री करा. सपोर्ट नसलेल्या फोन नंबरची WhatsApp वर नोंदणी केली जाऊ शकत नाही. या फोन नंबर्समध्ये खालील फोन नंबर्सचा समावेश आहे:
  • VoIP
  • लॅंडलाइन्स (टीप: लॅंडलाइन नंबर्सना फक्त WhatsApp Business ॲपवर सपोर्ट आहे)
  • टोल-फ्री नंबर्स
  • पेड प्रीमियम नंबर्स
  • युनिव्हर्सल ॲक्सेस नंबर्स (UAN)
  • खाजगी नंबर्स
त्याच फोनवर फोन नंबर बदलणे
तुम्ही तुमचा फोन तोच ठेवणार असाल आणि फक्त फोन नंबर बदलणार असाल, तर सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये नवीन फोन नंबरचे सिम कार्ड घाला आणि हे करा:
  1. WhatsApp उघडा.
  2. अधिक पर्याय
    > सेटिंग्ज > खाते > नंबर बदला > पुढे यावर टॅप करा.
  3. पहिल्या फील्डमध्ये तुमचा जुना नंबर लिहा आणि त्यानंतरच्या फील्डमध्ये नवा फोन नंबर लिहा. हे दोन्ही नंबर आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये आहेत याची खात्री करा.
  4. पुढे वर टॅप करा.
    • संपर्कांना सूचित करा सुरू केल्यानंतर तुम्ही या बदलाविषयी कोणाला कळवू इच्छिता याची निवड करता येईल. यासाठी तुम्ही सर्व संपर्क, मी ज्यांच्याशी चॅट केले ते संपर्क किंवा ऐच्छिक… यांपैकी एका पर्यायाची निवड करू शकता. तुम्ही ऐच्छिक... हा पर्याय निवडलात, तर तुम्हाला ज्या संपर्कांना सूचित करायचे आहे ते संपर्क शोधावे किंवा निवडावे लागतील. त्यानंतर बरोबरच्या खुणेवर
      टॅप करा.
    • तुम्ही फोन नंबर बदलला आहे याची सूचना तुमच्या ग्रुप चॅटना मिळेल. तुम्ही फोन नंबर बदलला आहे हे तुमच्या संपर्कांना कळवण्याबाबतच्या निवडीचा यावर काही परिणाम होणार नाही.
  5. पूर्ण झाले वर टॅप करा.
  6. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नवीन फोन नंबरची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या जातील. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
नवीन फोनवर फोन नंबर बदलणे
तुम्हाला तुमच्या जुन्या फोनवरील पूर्वीचे चॅट नव्या फोनवर हलवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या फोनवर Google ड्राइव्ह बॅकअप तयार करायला लागेल. ते कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा. तुम्ही Google ड्राइव्ह वर बॅकअप घेणार नसाल तर तुम्हाला तुमचा बॅकअप स्वत:च नव्या फोनवर हलवायला लागेल. ते कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
तुमच्या जुन्या फोनवर WhatsApp शी लिंक असलेला फोन नंबर बदलून झाल्यावर हे करा:
  1. तुमच्या नवीन फोनवर WhatsApp इंस्टॉल करा.
  2. तुमच्या नवीन फोन नंबरची नोंदणी करा.
  3. तुमचा बॅकअप रिस्टोअर करा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही